---Advertisement---

टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आशिया चषकातील 5 खेळाडूंची हाकालपट्टी

On: गुरूवार, सप्टेंबर 15, 2022 3:05 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 चे (T20 World Cup 2022) बिगूल वाजले आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकातील सामने खेळले जाणार आहेत. या आयसीसी स्पर्धेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी (15 सप्टेंबर) त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतून बाहेर झालेल्या अफगाणिस्तान संघाचे नेतृत्त्वपद मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याच्या हाती कायम आहे.

मात्र आशिया चषकातील संघात सहभागी 5 खेळाडूंना टी20 विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तसेच 4 जणांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने समीउल्लाह शिनवारी, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर जजई, करीम जनत आणि नूर अहमद यांची टी20 विश्वचषक संघातून हाकालपट्टी केली आहे. हे खेळाडू आशिया चषकासाठी अफगाणिस्तान संघाचा भाग होते. यापैकी अफसर जजईला राखीव खेळाडू म्हणून घेतले आहे. या खेळाडूंच्या जागी मधल्या फळीतील फलंदाज दारविश रसूली, अष्टपैलू कैस अहमद आणि वेगवान गोलंदाज सलीम सैफी यांना मुख्य संघात सहभागी केले आहे.

तसेच राखीव खेळाडू म्हणून जजईबरोबरच शराफ़ुद्दीन अशरफ, रहमत शाह, गुलबदीन नायब यांचीही निवड करण्यात आली आहे. दरम्यान अफगाणिस्तान संघाला एकदाही टी20 विश्वचषक जिंकता आलेला नाही.

टी20 विश्वचषकासाठी अफगानिस्तानचा संघ:
मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान (उपकर्णधार), रहमनुल्लाह गुरबज (यष्टीरक्षक), अजमतुल्लाह ओमरजई, दरवेश रसूली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारूकी, हजरतुल्लाह जजई, इब्राहिम जादरान, मुजीब उर रहमान, नवीन अहमद हक, कैस अहमद, राशिद खान, सलीम सफी, उस्मान गनी
स्टँडबाय: अफसर जजई, शराफ़ुद्दीन अशरफ, रहमत शाह, गुलबदीन नायब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---