ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे मागील वर्षी निधन झाले होते. थायलंड येथे सुट्ट्या घालवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आलेले. तसेच काहींनी त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे देखील म्हटले होते. त्याच्या या अकाली निधनानंतर अनेक चर्चा सुरू झालेल्या. त्याच्या निधनाच्या 15 महिन्यानंतर आता एक अहवाल समोर आला असून, त्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण सांगितले गेले आहे.
मागील वर्षी चार मार्च रोजी वॉर्न याचे थायलंड येथे निधन झालेले. त्यानंतर त्याच्या या मृत्यूची चांगली चर्चा झाली. अनेकांनी हा खून असल्याचे देखील म्हटलेले. मात्र, सध्या समोर आलेल्या अहवालानुसार, त्याचा मृत्यू कोविड लसीमूळे झाल्याचे सांगण्यात येते. त्या अहवालानुसार, कोविड लस काही दिवसानंतर हृदयरोगाला आमंत्रण देते असे म्हटले आहे. वॉर्न याने मृत्यूच्या नऊ महिने आधी ही लस घेतली होती. त्यामुळेच त्याच्या हृदयावर परिणाम होऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. विशेष म्हणजे एका भारतीय वंशाच्या हृदयरोग तज्ञ डॉक्टरांनीच हा दावा केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून वॉर्नला ओळखले जाते. मागील वर्षी 4 मे रोजी थायलंड येथे त्याचा आकस्मित मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास महिनाभराने सिडनी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या या अंत्यसंस्काराला तब्बल 50 हजार लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. त्याच्या निधनानंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या बाहेर त्याचा पुतळा देखील उभारण्यात आला आहे. तसेच त्याच्या नावाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुरस्कार देखील सुरू केलाय.
(Reason Of Shane Warne Death He Died Due To Covid Vaccine Reports)
महत्वाच्या बातम्या-
सोलापूरविरूद्ध पुणेरी बाप्पाचे टार्गेट प्ले ऑफ्स! ‘या’ चौकडीकडून आहेत अपेक्षा
MPL: विजयी हॅट्रिकसह कोल्हापूर प्ले ऑफ्समध्ये! सीएसकेचे आव्हान संपुष्टात