बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. मात्र संघात श्रेयस अय्यरचं नाव नसल्यामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अय्यरनं आयपीएलमध्ये केकेआरचं नेतृत्व करताना संघाला चॅम्पियन बनवलं होतं. मात्र त्यानंतरही भारतीय संघासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. यामागची कारणं काय असू शकतात, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
दुखापत आणि फिटनेस – मधल्या फळीत फलंदाजी करणारा अय्यर दुखापतींशी झगडत आहे. यामुळे त्याच्या कामगिरीवर आणि फिटनेसवरही परिणाम झाला. निवड समिती खेळाडूंची फिटनेस आणि फॉर्म पाहून निवड करते. यामुळे कदाचित अय्यरला संधी मिळाली नसावी. याशिवाय अय्यर गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळला नव्हता, ज्यामुळे त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आलं होतं.
दुलीप ट्रॉफीतील सामान्य कामगिरी – सध्या जारी दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरनं अद्याप फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. त्याचा संघात समावेश न होण्यामागचं हे देखील एक मोठं कारण असू शकतं. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या डावात जरी त्यानं अर्धशतक झळकावलं, तरी पहिल्या डावात त्याचा संघर्ष सुरूच होता. पहिल्या डावात त्याला केवळ 9 धावा करता आल्या.
सरफराज खानच्या आगमनानं स्पर्धा वाढली – मधल्या फळीत युवा सरफराज खानच्या उपस्थितीमुळे अय्यरसाठी स्पर्धा वाढली आहे. सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करतोय. त्यामुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली. तर दुसरीकडे अय्यरला टीम इंडियातून वगळण्यात आलं. अशा परिस्थितीत जर श्रेयस अय्यरला भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करायचं असेल, तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी खेळी खेळावी लागेल.
हेही वाचा –
गौतम गंभीरनंतर कोण बनणार केकेआरचा मेंटॉर? 2 आयपीएल जिंकणाऱ्या दिग्गजाचं नाव आघाडीवर
ऋतुराज-अय्यरला वगळलं, पण या तिघांना संधी कशी मिळाली? संघ निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासोबत दिसणार जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज, गंभीरशी खास नातं