ऍशेस 2023 स्पर्धा सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात केनिंग्टन ओव्हल मैदानात खेळला जात आहे. इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आल्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 295 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाकडे 12 धावांची आघाडी आहे. अशात ऑस्ट्रेलियाच्या 10पैकी 2 विकेट्स स्टुअर्ट ब्रॉड याने घेतल्या. त्याने या विकेट्स घेताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज बनला.
ब्रॉडचा विक्रम
ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेत स्टुअर्ट ब्रॉड ऑस्ट्रेलियाविरुद्ध 150 विकेट्स (Stuart Broad 150 wickets against Australia) घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज बनला आहे. के ओव्हलमध्ये अंतिम कसोटीत गोलंदाजी करताना ब्रॉडने लंच ब्रेकनंतर उस्मान ख्वाजा याला बाद करत संघाला खेळात पुनरागमन करण्यात मदत केली.
शानदार प्रदर्शन
इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने ऍशेसच्या पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. ब्रॉडने उच्च दर्जाची गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ख्वाजाला 47 धावांवर, तर थोड्याच वेळानंतर ट्रेविस हेडला फक्त 4 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
वॉर्न आणि मॅकग्राच्या यादीत सामील
क्रिकेटच्या सर्वात जुन्या प्रतिस्पर्धांपैकी ऍशेस मालिकेत आतापर्यंत ब्रॉडसह 3 गोलंदाजांनी 150 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अव्वलस्थानी शेन वॉर्न आहे. त्याने 36 कसोटीत 23.25च्या सरासरीने 195 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, दुसऱ्या स्थानी ग्लेन मॅकग्रा असून त्याने 30 सामन्यात 20.92च्या सरासरीने 157 विकेट्स घेतल्या होत्या. सक्रिय गोलंदाजांमध्ये ब्रॉडने पहिले स्थान पटकावले आहे. त्याच्यानंतर जेम्स अँडरसन 116 विकेट्ससह चौथ्या स्थानी आहे.
ब्रॉडची कसोटी कारकीर्द
स्टुअर्ट ब्रॉड याने सन 2007मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली होती. ब्रॉडने 16 वर्षांच्या कारकीर्दीत इंग्लंडकडून आतापर्यंत 167 कसोटी सामने खेळताना 27.64च्या सरासरीने आणि 2.98च्या इकॉनॉमी रेटने 602 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 20 वेळा एका डावात 5 विकेट्स, तर 3 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे. 602 विकेट्ससह तो सर्वात विकेट्स घेणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे. पहिल्या स्थानी अँडरसन असून त्याच्या नावावर 690 विकेट्स आहेत. (record ashes 2023 stuart broad becomes first england bowler clinch 150 wickets vs australia)
महत्त्वाच्या बातम्या-
SRHची मालकीण काव्या मारनला दु:खात पाहू शकत नाहीत रजनीकांत; म्हणाले, ‘हैदराबादने आता…’
बीसीसीआयकडून संजू सॅमसनवर अन्याय! क्रिकेटच्या जंटलमनसोबत घडतंय राजकारण?