क्रिकेटटॉप बातम्या

स्टुअर्ट ब्रॉडची काळी जादू! लाईव्ह सामन्यात असं काही केलं की, पुढच्याच चेंडूवर लॅबुशेननं गमावली विकेट

ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केविंगटन ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमाणाने चांगले प्रदर्शन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, पहिल्याच सत्रात इंग्लंडचा दिग्गज स्टुअर्ट ब्रॉडने मैदानात उपस्थिती सर्वांना आश्चर्यचकित केले. ब्रॉडच्या कारनाम्यामुळे चाहत्यांसह विरोधी संघाचे खेळाडू आणि त्याचे सहकाही देखील हैराण राहिले आहेत.

ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या या पाचव्या ऍशेस कसोटीत पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 1 बाद 61 धावा होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी पहिली विकेट गमावली ती मार्नस लॉबुशेन (Marnus Labuschagne) याची. पहिल्या डावातील 43व्या षटकात मार्क वुड (Mark Wood) गोलंदाजीला आला होता. षटकातील पाचव्या चेंडूवर वुडने लॅबुशेनला स्लिप्समध्ये जो रुटच्या हातात झेलबाद केले. पण हा चेंडू टाकण्याआधीच स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने सर्वांसमोर एक अनोखी चाल चालली होती. लॅबुशेनच्या विकेटचा आणि ब्रॉडने एक चेंडू आधी केलेल्या या कृतीचा तसा पाहिला तर एकमेकांशी काहीच संबंध नाही, पण तरीही या दोन गोष्टी एकमेकांशी जोडल्या जात आहेत. स्वतः लॅबुशेन देखील विकेट गमावल्यानंतर खूपच निराश झाला होता.

सोशल मीडियावर काही चाहते ब्रॉडने लाईव्ह सामन्यात काळी जादू करून लॅबुशेनला बाद केले, असे म्हणत आहेत. त्याचे झाले असे की, लॅबुशेनने विकेट गमावण्याच्या एक चेंडू आधी ब्रॉडने स्ट्राईक एंडला जाऊन स्टंप्सच्या बेल्स आदला-बदली केल्या होत्या. म्हणजेच त्याने डाव्या बाजुची बेल्स उजव्या बाजुला केली आणि उजव्या बाजुची बेल्स डाव्या बाजुला केली. सुरुवातील ब्रॉडने असे का केले हे कुणालच समजले नाही. लॅबुशेन देखील ब्रॉडचा वेडेपणा पाहून हसत होता. मात्र, पुढच्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने विकेट गमावली. ब्रॉडची ही करामत पाहून सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर चाहत्यांकडून याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वुडने विकेट घेतल्यानंतर लॅबुशेन चांगलाच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने याबाबत पंचांकडे तक्रार केल्याचेही व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी चहापाणापर्यंत ऑस्ट्रेलिायची धावसंख्या 7 बाद 186 धावा होती. शुक्रवारी (28 जुलै) चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या एकून 6 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. (Stuart Broad’s Black Magic! In the live match, Labuschagne lost his wicket on the very next ball)

महत्वाच्या बातम्या –
WIvsIND । फलंदाजाची गरज पूर्ण करण्यास संघ व्यवस्थापन असमर्थ! सूर्यावर का आली सॅमसनीच जर्सी घालण्याची वेळ?
WIvsIND । प्लेअर ऑफ द मॅच होताच कुलदीपने काढली चहलची आठवण! काय म्हणाला वाचाच

Related Articles