भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकेस सुरुवात झाली आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला जो भारताने 5 विकेट्स राखून नावावर केला. उभय संघांतील या सामन्यात सूर्यकुमार यादव संजू सॅमसनची जर्सी घालन मैदानात आला होता. चाहत्यांना सूर्यकुमारने संजूची जर्सी घालण्यामागचे कारण जाणून घ्यायचे आहे. अशातच याबाबत ताजी माहिती समोर येत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताकडे यष्टीरक्षकांचे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे संजू सॅमसन (Sanju Samson) आणि दुसरा ईशान किशन (Ishan Kishan). पहिल्या वनडेसाठी ईशान किशनला फ्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर सॅमसनला बेंचवर बसवण्यात आले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग होता, जो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसला. सूर्यकुमार जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा चर्चा मात्र सॅमसनच्या नावाची होऊ लागली. कारण सूर्यकुमार स्वतःची जर्सी न घातला सॅमसनची जर्सी घालून मैदानात उतरला होता.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला. सूर्यकुमार यादव या सामन्यात संजू सॅमसनची जर्सी घालून आल्यामुळे तुफान चर्चा झाली. सोशल मीडियावर देखील याबाबत अनेक मजेशीर मिम्स व्हायरल होत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार सूर्यकुमार यादवने ऐन वेळी संघ व्यवस्थापनाकडे मोठ्या जर्सीची मागणी केली होती.आधीची जर्सी साईझ त्याला फिट येत नसल्यामुळे त्याने नव्या जर्सीची मागणी केली होती. पण संघ व्यवस्थापन ऐन वेळी सुर्याला नवी जर्शी देऊ शकले नाही. याच कारणास्तव त्याने सॅमसनची जर्सी घालून मैदानात उतरण्याचा पर्याय शोधला.
सामन्याचा विचार केला, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघ 23 षटकांमध्ये अवघ्या 114 धावा करून सर्वबाद झाला, तर भारताने 22.5 षटकांत 118 धावा करून सामन्यावर विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या:
WIvsIND । प्लेअर ऑफ द मॅच होताच कुलदीपने काढली चहलची आठवण! काय म्हणाला वाचाच
टी-20चा सुपरस्टार वनडेत फ्लॉप! सॅमसनला मिळणार संधी? दोघांच्या आकडेवारीत जमीन-आस्मानाचा फरक