वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात भारतीय संघाने विजयासह केली. मालिकेतील पहिला वनडे सामना बारबाडोसमध्ये खेळला गेला आणि भारताने यात 5 विकेट्सने विजय मिळवला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि अवघ्या 19 धावा करून तंबूत परतला. अशात पुढच्या सामन्यात संघ व्यवस्थापन सूर्यकुमारच्या जागी संजू सॅमसन याला संधी देण्याचा विचार करू शकते.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा स्टार खेळाडू आहे. पण वनडे क्रिकेटमध्ये त्याला अद्याप यश मिळाले नाहीतेय. पदार्पणापासून त्याला अतापर्यंत संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी अनेक संधी दिल्या आहेत. पण वनडे फॉरमॅठमध्ये सूर्यकुमार स्वतःला अजूनही सिद्ध करू शकला नाहीये. गुरुवारी (27 जुलै) सूर्यकुमार वेस्ट इंडीजविरुद्ध 25 चेंडू खेळला. यात 3 चौकार आणि एक षटकार मारून त्याने 19 धावांवर विकेट गमावली. गुडाकेश मोती याने सूर्यकुमारला पायचीत धरले. मागच्या 18 वनडे सामन्यांमध्ये त्याची आकडेवारी खूपच निराशाजनक राहिली आहे. सूर्याने 18 वनडे सामन्यात अवग्या 18.06च्या सरासरीने 91.45च्या स्ट्राईख रेटने धावा केल्या आहेत. तसेच दुसरीकडे टी-20 फॉरमॅटमध्ये खेळलेल्या मागच्या 18 सामन्यांमध्ये सूर्यकुमारची सरासरी धावसंख्या 68.16 राहिली आहे. 178.21च्या स्ट्राईक रेटने त्याने यादरम्यानच्या कालात धावा केल्या आहेत.
सॅमसनच्या एकंदरीत वनडे कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये 452 धावा केल्या केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 23.78 राहिली आहे. दुसरीकडे संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या वनडे कारकिर्दीचा विचार केला तर आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमणध्ये यष्टीरक्षक फलंदाजाने 66च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. सूर्यकुमारच्या तुलनेत सॅमसनची आखडेवारी वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त राहिली आहे. अशात दुसऱ्या वनडे सामन्यासाठी त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली, तर चौथ्या क्रमांकावर तो आपली गुणवत्ता चांगल्या पद्धतीने सिद्ध करू शकतो. वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा वनडे सामना शनिवारी (29 जुलै) खेळला जाणार आहे. (Sanju Samson may get a chance to replace Suryakumar Yadav in the second ODI against West Indies)
महत्वाच्या बातम्या –
एकच मारला, पण कच्चून मारला! छोटेखानी खेळीत सूर्याच्या गगनचुंबी षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष, Video
सोपा विजय अन् विक्रमांचा पाऊस! पहिल्या वनडेत भारताने बांधली रेकॉर्ड्सची भिंत, एक नजर टाकाच