भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज युसूफ पठाण याने आपल्या वादळी खेळीने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. सध्या जिम्बाब्वेमध्ये जिम एफ्रो टी-10 लीग खेळली जात आहे. या लीगमध्ये युसूफ पठाण जोबर्ग बफेलोज संघासाठी खेळत आहे. शुक्रवारी (28 जुलै) युसूफने अवघ्या 26 चेंडूत 80 धावांची वादळी खेळी करत डरबन कलंदर्स संघाला क्वॉलिफायर सामन्यात पराभूत केले.
युसूफ पठाण (Yusuf Pathan) याने या क्वॉलिफायर सामन्यात जोबर्ग बफेलोज (Joburg Buffaloes) संघासाठी खेळताना 4 चौकार आणि 9 षटकार कुटले आणि संघासाठी शेवटच्या षटकांमध्ये महत्वपूर्ण धावा केल्या. अवघ्या 26 चेंडूत 80 धावांची खेली करून तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम होता. शेवटच्या षटकातील सहा चेंडूंवर युसूफने तीन षटकार आणि तीन चौकार मारले. जोबर्ग संघाला शेवटच्या 46 चेंडूत 126 धावा हव्या होत्या, ज्या युसूफच्या वादळी खेळीमुळे संघाला मिळाल्या. शेवटच्या तीन षटकांमध्ये त्याने 7 षटकार आणिचार षटकार मारले. यादरम्यान अवघ्या तीन चेंडूंवर त्याने पळून धावा घेतल्या.
जोबर्ग बफेलोजला या सामन्यात 10 षटकांमध्ये 142 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 4 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. युसूफ पठाण सामनावीर ठरला. त्याच्याव्यतिरिक्त संघातील दुसरा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा गाढू शकला नाही. युसूफने या लीगणध्ये याआधीहीच्या सामन्यांमध्येही अशाच प्रकारे वादळी खेळी केली आहे. एका सामन्यात त्याने 21 चेंडूत 36, तर एका सामन्यात 16 चेंडूत 32 धावा केल्या आहेत. (Unbelievable hitting Yusuf Pathan in Zim Afro T10 Leauge)
महत्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट ब्रॉडची काळी जादू! लाईव्ह सामन्यात असं काही केलं की, पुढच्याच चेंडूवर लॅबुशेननं गमावली विकेट
WIvsIND । फलंदाजाची गरज पूर्ण करण्यास संघ व्यवस्थापन असमर्थ! सूर्यावर का आली सॅमसनीच जर्सी घालण्याची वेळ?