इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात लॉर्ड्स मैदानावर एकमेव कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडला 10 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या विजयासोबतच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने कसोटीत नवीन इतिहास रचला आहे. स्टोक्सने एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे, जो 146 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात आतापर्यंत कुणालाही शक्य झाला नव्हता. इंग्लंड संघाला सामना जिंकण्यासाठी तिसऱ्या दिवशी 11 धावांचे आव्हान मिळाले होते, जे झॅक क्राऊले याने 3 चौकार मारत पूर्ण केले.
बेन स्टोक्सचा विक्रम
बेन स्टोक्स (Ben Stokes) आपल्या संघाला एक डाव राखून विजय मिळवून देऊ शकला नाही, पण त्याने हा सामना जिंकताच कसोटी क्रिकेटमध्ये एक नवीन इतिहास रचला. स्टोक्स कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा एकमेव कर्णधार बनला आहे, ज्याने फलंदाजी, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण न करता सामना जिंकला आहे.
स्टोक्सपूर्वी कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी जमली नव्हती, ज्याने फलंदाजी केली नसेल, गोलंदाजीही केली नसेल आणि क्षेत्ररक्षणही केले नसेल. मात्र, त्याने या सामन्यादरम्यान एक झेल पकडला होता
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या एकमेव कसोटीत इंग्लंडने आयर्लंडला 10 विकेट्सने ठेचले. ‘बजबॉल’ क्रिकेट खेळत असलेल्या इंग्लंड संघाने सहजरीत्या हा विजय साकारला. मात्र, एक वेळ अशी आली होती की, मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) याचा संघ एक डावाने सामना जिंकेल, पण ते शक्य झाले नाही.
इंग्लंड संघाला विजयासाठी 11 धावांची गरज होती, हे आव्हान झॅक क्राऊले याने दुसऱ्या डावातील चार चेंडूतच पार केले. क्राऊलेने मार्क अडायर याच्या चेंडूवर 3 चौकार मारले.
यापूर्वी आयर्लंड संघाने दुसऱ्या डावात 362 धावांवर गाशा गुंडाळला होता. संघाकडून मार्क अडायरने 88 धावा आणि अँडी मॅकब्राईन याने 86 धावा केल्या. लॉर्कन टकर याने 44 आणि हॅरी टेकर याने 51 धावांचे योगदान दिले होते. इंग्लंडसाठी जोश टंग याने 5 विकेट्स चटकावल्या. स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स, जॅक लीच आआणि जो रूट यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (record ben stokes becomes the 1st test captain in history to win a test match without batting-bowling or wicketkeeping)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुझ्या नोटांपेक्षा जास्त माझे…’, सेहवागचा ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरवर तिखट मारा
शेन वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला 30 वर्षे पूर्ण, आख्ख्या जगाला भुवया उंचावण्यास पाडलेले भाग