बुधवारी (दि. 12 जुलै) श्रीलंका महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील अखेरचा सामना पार पडला. कोलंबो येथे पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका संघाने 10 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह श्रीलंका संघाने इतिहास रचला आहे. चमारी अटापट्टू हिच्या नेतृत्वातील श्रीलंकेने टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 विकेट्सने विजय मिळवण्याची कामगिरी केली. श्रीलंकेने एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला, तर टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडवर पहिल्यांदाच 10 विकेट्सने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली.
श्रीलंकेचा दमदार विजय
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी20 सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय संपूर्ण संघाने योग्य ठरवला. यावेळी न्यूझीलंड संघाने 20 षटकात 9 विकेट्स गमावत 140 धावा केल्या. यावेळी न्यूझीलंडकडून सुझी बेट्स हिने शानदार फलंदाजी करताना 37 धावा केल्या, तर कर्णधार सोफिया डिवाईन (Sophie Devine) हिने 25 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना इनोका रनवीरा हिने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, सुगंदिका कुमारीने 2, तर काव्या काविंदी, प्रियदर्शनी आणि कविशा दिलहारी यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
चमारी अटापट्टूची वादळी फलंदाजी
विशेष म्हणजे, पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या श्रीलंका संघापुढे 141 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात शानदार राहिली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली कर्णधार चमारी अटापट्टू हिने शानदार अंदाजात फलंदाजी करत 47 चेंडूत नाबाद 80 धावा चोपल्या. यामध्ये 2 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. या धावा तिने 170.21च्या स्ट्राईक रेटने केल्या. अटापट्टूला हर्षिता समरविक्रमा हिची चांगली साथ मिळाली. दोघींनीही पहिल्या विकेटसाठी नाबाद 143 धावांची भागीदारी रचत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यावेळी हर्षिताने 40 चेंडूत नाबाद 49 धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे टी20 क्रिकेटच्या इतिहासात न्यूजीलंड महिला संघ पहिल्यांदाच 10 विकेट्सने पराभूत झाला.
What a thrilling end to an incredible series! Sri Lanka dominates today’s match against New Zealand, securing a sensational 10-wicket victory. ???? #LionessRoar
This remarkable win marks the first time Sri Lanka has defeated New Zealand in T20I cricket. ????
???????? New Zealand emerged… pic.twitter.com/n3KmEJFkf0
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 12, 2023
टी20 मालिका न्यूझीलंडच्या नावावर
तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंड महिला संघाचा पराभव झाला असला, तरीही त्यांनी ही मालिका 2-1ने आपल्या नावावर केली. पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच, दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने बाजी मारली होती. मात्र, त्याआधी झालेल्या वनडे मालिकेत श्रीलंकेने इतिहास घडवत 2-1ने मालिका खिशात घातली होती. (record sri lanka women cricket team registered their first ever win with 10 wickets in t20 international cricket against new zealand)
महत्वाच्या बातम्या-
WI vs IND : विराटच्या निशाण्यावर 5 विक्रम, शतक ठोकताच करणार ब्रॅडमन यांच्या रेकॉर्डची बरोबरी
कर्णधार रोहितला पुणेकर ऋतुराजची फुल गॅरेंटी, तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याने दाखवून दिलंय…’