इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने 72 धावांनी विजय मिळवला. या विजयात युझवेंद्र चहल यानेही मोलाचे योगदान दिले. चहलने या सामन्यात सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या. या कामगिरीमुळे त्याच्या नावावर भलामोठा विक्रम नोंदवला गेला. तो अशी कागमिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला. चला तर चहलने काय विक्रम केलाय, जाणून घेऊयात…
युझवेंद्र चहलचा विक्रम
सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थान रॉयल्स संघाने 3 खेळाडूंच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 5 विकेट्स गमावत 203 धावांचा डोंगर उभारला. यासह राजस्थान आयपीएल 2023 स्पर्धेत 200 धावा करणारा पहिला संघ ठरला. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाच्या नाकी नऊ आल्या. हैदराबादने यावेळी निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 131 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानने हा सामना 72 धावांनी खिशात घातला. या सामन्यात राजस्थानकडून युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या आणि खास विक्रम रचला.
Shining with the ball, the @yuzi_chahal way ✨
Relive the @rajasthanroyals spinner's fabulous four wicket haul 👌👌 #TATAIPL | #SRHvRR
WATCH 🎥🔽https://t.co/yLIH38iDnS
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
चहलने विकेट घेतलेल्या खेळाडूंमध्ये मयंक अगरवाल, हॅरी ब्रूक, आदिल रशीद आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावाचा समावेश होता. या चार विकेट्स काढताच चहल टी20 क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्या एकूण 303 विकेट्स झाल्या आहेत. या विकेट्स त्याने हरियाणा, भारत, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांकडून खेळताना घेतल्या आहेत. (Yuzvendra Chahal becomes the first Indian to take 300 T20 wickets)
A superb win in Hyderabad for @rajasthanroyals 👏👏@yuzi_chahal23 is our 🔝 performer of the match for his fabulous 4️⃣-wicket haul to hand #RR a comprehensive win over #SRH!
Scorecard ▶️ https://t.co/khh5OBILWy#TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/1uZld81TwA
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
चहलव्यतिरिक्त सर्वाधिक टी20 विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी भारताचा अनुभवी आर अश्विन (R Ashwin) आहे. त्याने 288 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी पीयुष चावला (Piyush Chawla) असून त्याने 276, तर चौथ्या स्थानी असलेल्या अमित मिश्रा (Amit Mishra) याने 272 विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
303 – युझवेंद्र चहल*
288 – आर अश्विन
276 – पीयुष चावला
272 – अमित मिश्रा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: तब्बल 55000 फॅन्समध्ये एकट्या चहलच्या पत्नीने लुटली वाहवा, टाळ्यांच्या कडकडाटासह केले चीअर
सिक्स मारला डू प्लेसिसने, पण विराटला झाला भलताच आनंद; मैदानावरच लागला नाचू, व्हिडिओ तुफान व्हायरल