पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (२४ जून) अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात मुलतान सुलतान आणि पेशावर जाल्मी हे संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात मुलतान सुलतान संघाने ४७ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा विजेता होण्याचा मान पटकावला. या अंतिम सामन्यात, खेळाडूंनी अनेक विक्रम केल्याचे देखील पाहायला मिळाले. चला पाहूया या सामन्यातील काही खास विक्रम.
सर्वोच्च धावांचे आव्हान
पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलतान सुलतान संघाने नाणेफेक गमावली होते. त्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. मुलतान सुलतान संघातील सुरुवातीच्या ४ फलंदाजांनी तुफानी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर मुलतान सुलतान संघाला २० षटक अखेर ४ बाद २०६ धावा करण्यात यश आले होते. हा एक विक्रम आहे. यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतक्या धावा कुठल्याच संघाला करता आल्या नव्हत्या.
शोएब मक्सुदची तुफानी खेळी
पाकिस्तान सुपर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार आणि मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या शोएब मक्सुदने अवघ्या ३५ चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले होते. याच खेळीच्या जोरावर मुलतान सुलतान संघाला २०० धावांचा पल्ला गाठण्यात यश आले.
रुसोचे धमाकेदार अर्धशतक
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलतान सुलतान संघाचा अनुभवी फलंदाज रूसोने अवघ्या २० चेंडूंमध्ये ५० धावांची तुफानी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या या आक्रमक फलंदाजाने आपल्या खेळीदरम्यान ३ षटकार आणि ५ चौकार लगावले.
अंतिम सामन्यात इमरान ताहीरचा जलवा
मुलतान सुलतान संघाचा फिरकी गोलंदाज इमरान ताहीर याने अंतिम सामन्यात आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पेशावर जाल्मी संघाला २४ चेंडुंमध्ये ५८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांचे ५ गडी शिल्लक होते. त्यावेळी १७ वे षटक टाकण्यासाठी इमरान ताहीर आला होता.
याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने शरफेन रुदरफोर्डला (१८ धावा) बाद करत माघारी धाडले होते. तर षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने वाहब रियाज (० धावा) आणि सहाव्या चेंडूवर मोहम्मद इमरानला (०) बाद करत माघारी धाडले होते. एका षटकातील ४ चेंडूंमध्ये ३ विकेट्स घेत त्याने मुलतान सुलतान संघाचा विजय निश्चित केला होता.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध गिलऐवजी अग्रवालला देण्यात यावी संधी, ‘ही’ आहेत त्यामागची प्रमुख कारणे
‘या’ क्रिकेटपटूंचा छंदच न्यारा, आकर्षक मिशीमुळे राहतात चर्चेत; एकाने तर मिशीचा काढलाय विमा
‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन