आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगला. सर्व क्रिकेटप्रेमींना हा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा असताना, आरसीबीसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस व विराट कोहली यांनी वादळी शतकी भागीदारी करत सामना एकतर्फी बनवला. हंगामातील पहिल्याच सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवत आरसीबीने चांगली सुरुवात केली. आरसीबीच्या या विजयात एक चिंता करणारी बाबदेखील आहे. कारण, संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज रिस टोप्ली हा दुखापतग्रस्त झाला आहे.
आरसीबीने या वर्षीच्या हंगामाआधीच्या लिलावात इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज रिस टोप्ली याला 4 कोटींची रक्कम देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. मात्र, हंगामातील पहिल्या सामन्यात त्याला दुखापतग्रस्त व्हावे लागले. मुंबईच्या डावाच्या आठव्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना तो उजव्या खांद्यावर पडला. तो पडताक्षणी वेदनेने विव्हळताना दिसला.
चालू सामन्यातच त्याचा खांदा निखळल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर सामना संपल्यावर संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने म्हटले,
“होय त्याचा खांदा निखळलेला. मात्र, आता तो जागेवर बसवला. अधिकृतपणे काही सांगता येणार नाही मात्र तो कदाचित पाच-सहा सामन्यांना मुकु शकतो.”
आरसीबीला या हंगामाच्या सुरुवातीपासूनच दुखापतींनी वेढले आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड हा किती सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच प्रमुख फलंदाज रजत पाटीदार हा देखील अर्ध्या हंगामात सहभागी होणार नाही. लिलावात कोट्यावधीची किंमत लावून खरेदी करायला इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.
(Reece Topley Might Miss Half Season Due To Shoulder Injury For RCB In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023बाबत ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ 4 संघ करतील प्लेऑफमध्ये एन्ट्री, RCBची हाकालपट्टी
अशी ताकद लावायची! दिग्गज विराटकडून युवा फलंदाज तिलक अन् नेहालला खास टिप्स, फोटो जोरदार व्हायरल