रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये गट ब मध्ये पंजाबचा सामना बुधवारपासून (28 नोव्हेंबर) दिल्ली विरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग खेळणार आहे.
त्याच्या संघात परतण्याने पंजाब संघाला आत्मविश्वास मिळाला आहे. कारण त्यांचे आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेश विरुद्धचे सामने अनिर्णीत राहिले आहेत. तसेच त्यांना या सामन्यामध्ये पहिल्या डावात आघाडी घेण्यातही अपयश आले होते.
युवराज आता या रणजी स्पर्धेत हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू यांच्या विरुद्धच्या पुढील दोन्ही सामन्यासाठीही उपलब्ध असणार आहे.
मात्र पंजाब संघातील शुभमन गिल आणि दिल्लीचा गोलंदाज नवदीप सैनी काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. कारण हे दोघेही सध्या न्यूझीलंडमध्ये भारत अ संघासोबत आहे.
या रणजी ट्रॉफीमध्ये पंजाब प्रमाणेच दिल्लीलाही अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यांचे हैद्राबाद आणि हिमाचल प्रदेश विरुद्धचे सामने अनिर्णीत राहिले आहेत. दिल्लीच्या कर्णधारपदाचा गौतम गंभीरने राजीनामा दिल्याने ही जबाबदारी युवा फलंदाज नितीश राणाकडे सोपवण्यात आली आहे.
तसेच हैद्रबाद विरुद्धचा सामन्या गंभीर दुखापतीमुळे मुकला होता. मात्र त्याने या सामन्यातून पुनरागमन केले आहे.
युवराजने भारताकडून शेवटचा सामना जून 2017 मध्ये खेळला आहे. मात्र त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. तसेेच त्याला आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबनेही 2019 च्या आयपीएलसाठी मुक्त केले आहे.
त्याने भारताकडून 40 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 1900 धावा आणि 9 विकेट्स केल्या आहेत. तर 304 वनडे सामन्यात 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–बंदी घातेलला स्टिव स्मिथ खेळणार चौथ्याच संघाकडून
–पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाने घेतला हा मोठा निर्णय
–मिताली राज- हरमनप्रीत प्रकरण काही थांबेना, पुन्हा नवा खुलासा जगासमोर
–आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील टीम इंडियाची संकट काही कमी होईनात