चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशला हरवून चांगली सुरुवात केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशला 4 विकेट्सने पराभूत केले. आता 23 फेब्रुवारी रोजी भारतीय संघासमोर पाकिस्तान संघाच आव्हान असणार आहे. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात महासामना रंगणार आहे. या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भारत पाकिस्तान सामन्यात एका पेक्षा एक रंजक घटना पहायला मिळतील. पण आपण जाणून घेऊया की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील भारत पाकिस्तान सामन्यातले काही महत्वपूर्ण क्षण
वर्ल्ड कप 1992 मध्ये भारत पाकिस्तान जेव्हा समोरासमोर होते तेव्हा पाकिस्तानकडून जावेद मियांदाद फलंदाजी करत होता. या दरम्यान भारतीय संघाचा यष्टिरक्षक किरण मोरे सोबत त्याचे वादविवाद होत होते, त्यानंतर अचानक जावेद मियांदाद कांगारू सारखी खेळी करू लागला. त्याची ही गोष्ट चाहत्यांना खटकली . तसेच भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीनने तोंडावर जावेद मियांदादला ऐकवले.
वर्ल्ड कप 1996 मध्ये जेव्हा भारत पाकिस्तान संघात सामना बेंगलोर येथे खेळला जात होता, तेव्हा पाकिस्तान संघ धावांचा पाठलाग करत होता. तेव्हा आमिर सोहेल चांगली फलंदाजी करत होता. आमिरने व्यंकटेश प्रसादाच्या चेंडूवर चौकार मारला आणि त्याला चेंडू कडे बघ म्हणून डिवचले. नंतर व्यंकटेश प्रसादने शांत न बसता पुढच्याच चेंडूत त्याला बाद केले. या दरम्यान व्यंकटेशचा आनंद बघण्याजोगा होता. सोबतच पूर्ण चिन्नास्वामी स्टेडियम आनंदाने नाचत होत.
1997 टोरंटोच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना चालू असताना पाकिस्तान संघ फील्डिंग करत होता. त्यादरम्यान चाहते स्टेडियम मधून इंजमाम उलहकला आलू- आलू म्हणून चिडवत होते. तेव्हा इंजमामने स्टेडियम मध्ये घुसून बॅटने चाहत्याला मारले त्या गोष्टीची कुणी कल्पनाही केली नव्हती.
पाकिस्तान संघ 2007 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळेस वनडे सामन्यात भारतीय खेळाडू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहीन आफ्रिदी समोरासमोर होते. दोघांमध्ये वादविवाद झाला, हा वाद एवढा वाढला की अंपायर आणि खेळाडूंना मध्ये पडावे लागले.
एशिया कप 2010 मध्ये भारत- पाकिस्तान समोरासमोर होते. त्यावेळी भारतासाठी हरभजन सिंग फलंदाजी करत होता. त्यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने डॉट बॉल टाकल्यानंतर हरभजनला काहीतरी म्हणून चिडवले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. पण नंतर हरभजनने शोएबच्या चेंडूवर दोन षटकार लावले आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा
“भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानमध्ये टीव्ही सुरक्षित असणार? माजी खेळाडूने दिले मोठे वक्तव्य”
RCB vs MI; हरमनप्रीत कौरचे शानदार अर्धशतक! मुंबईचा सलग दुसरा विजय
AFG vs SA: रायन रिकेल्टनचे शानदार शतक! आफ्रिकेची विजयी सलामी






