दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेल स्टेनने मोठी भविष्यवाणी केलेली आहे. त्याने एक तारीख सांगितली आहे जेव्हा आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 300 धावसंख्येचा आकडा पार होणार आहे. 2025 च्या दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 286 धावा केल्या होत्या. आत्तापर्यंत आयपीएल स्पर्धेमध्ये अनेक संघांनी 250 हुन अधिक धावा केल्या आहेत, पण 300 धावांचा आकडा कुणीही पार केलेला नाही. आता डेल स्टेनच म्हणणं आहे की, 17 एप्रिल रोजी आयपीएलमध्ये पहिल्यांदा 300 धावा केल्या जातील. जाणून घ्या की 17 एप्रिल रोजी कोणत्या संघांमध्ये सामना होणार आहे.
डेल स्टेनने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे, की ही माझी एक छोटी भविष्यवाणी आहे 17 एप्रिल रोजी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 300 धावा केल्या जातील. कोणाला माहित आहे की हे जेव्हा होईल तेव्हा मी देखील तिथे उपस्थित असेल. डेल स्टेन सनरायजर्स हैदराबादच्या प्रभावी कामगिरीमुळे आश्चर्यचकित झाला आहे. तो स्वतःच 2013- 15 पर्यंत सनरायजर्स हैदराबादसाठी खेळलेला आहे.
डेल स्टेनने विशेष स्वरूपात 17 तारीख या रेकॉर्डसाठी निवडली आहे. या दिवशी आयपीएल 2025 मधील सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघामध्ये सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. जेव्हा मागच्या हंगामात मुंबई हैदराबाद आमने-सामने आले होते. तेव्हा हैदराबादने 277 धावा केल्या होत्या नंतर धावांचा पाठलाग करताना मुंबईने 246 धावा केल्या पण ते 31 धावांनी सामना पराभूत झाले.
आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या सुद्धा सनरायजर्स हैदराबादच्या नावावर आहे. हैदराबादने आयपीएल 2024 मध्ये आरसीबी विरुद्ध 287 धावा केल्या होत्या, ही धावसंख्या आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.