भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषकासाठी कायम स्मरणात राहतील. यशपाल यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच 11 ऑगस्ट 1954 रोजी लुधियाना, पंजाब येथे झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले. ते 1983 च्या विश्वचषकाचे नायक होते परंतु त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी डावात ते शुन्य वर बाद झाले होते. त्यांनी नोव्हेंबर 1983 मध्ये दिल्लीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यशपाल यांचे गेल्या महिन्यात 13 जुलै रोजी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
यशपाल 1983 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. त्यांनी भारतासाठी 37 कसोटी सामने खेळले आणि एकूण 1606 धावा केल्या. त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 140 होती. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 2 शतके आणि 9 अर्धशतके केली. त्यांची कसोटीत सरासरी 33.45 होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 42 सामन्यांमध्ये 28.48 च्या सरासरीने 883 धावा केल्या, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 2003 ते 2006 पर्यंत ते भारतीय संघाच्या निवड समिती सदस्य देखील होते.
यशपाल आपला मुद्दा नेहमी परखडपणे मांडत असत. निवड समितीचे सदस्य असताना त्यांनी संघाचे तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याविरोधातही आवाज उठवला होता. त्यांनी उत्तर प्रदेश संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले. 1983 च्या विश्वचषकाचे नायक म्हणून ते नेहमीच ओळखले जातील. डिसेंबर 2005 पर्यंत त्यांनी निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांना 2008 मध्ये पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली होती.
Remembering Yashpal Sharma ji on his birth anniversary. 🙏 pic.twitter.com/txc7L3cGkv
— BCCI (@BCCI) August 11, 2022
यशपाल बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. त्याने एकदा असेही म्हटले होते की, दिलीप कुमार यांनी आपली कारकीर्द घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी 13 जुलै रोजी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.
पंजाबचा रणजी सामना पाहिल्यानंतर दिलीप कुमार यांनी बीसीसीआयमध्ये राजसिंह डुंगरपूर यांच्याशी यशपालसाठी बोलले, यासाठी ते दिलीप कुमार यांचे कायम ऋणी राहिले. यशपालने 1983 च्या विश्वचषकात गटातील सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध 89 धावांची दमदार खेळी खेळली होती. या सामन्यानंतरच लोकांना वाटले की भारत विश्वचषक जिंकू शकतो, आणि हे देखील खरे ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
“पाकिस्तानला एशिया कपची पर्वा नाही, फक्त २-३ सामन्यात भारताला हरवायचे आहे”
‘या’ कारणामुळे ११ वर्षांपूर्वी आजचा दिवस महेंद्रसिंग धोनीसाठी ठरला होता काळा दिवस
पुन्हा एकदा सुंदरच्या मानगुटीवर दुखापतीचे भूत; झिम्बाब्वे दौऱ्याला मुकण्याची शक्यता