भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील कामगिरी विषयी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने पंड्याच्या नावासमोरुन अष्टपैलू टॅग काढून टाका, अशी कडक शब्दात टीका केली आहे.
पंड्याला इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात फक्त 90 धावाच करता आल्या आहेत. तसेच त्याला पहिल्या सामन्यात विकेट घेण्यात अपयश आले होते. तर त्याने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट घेतल्या आहेत.
त्यामुळे इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार हरभजनने पंड्यावर टीका करताना म्हटले आहे की “त्याने फलंदाजी करताना खूप धावाही केल्या नाहीत. तसेच कर्णधारही त्याच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवताना दिसत नाही. ”
“जर पंड्या या परिस्थितीत गोलंदाजी करु शकत नसेल तर भविष्यात त्याच्यासाठी आणि भारतीय संघाला हे कठीण जाईल. त्याच्या नावावरुन अष्टपैलू हा टॅग काढून टाकायला पाहिजे. कारण अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात योगदान देतो.
“ज्याप्रमाणे बेन स्टोक्स, सॅम करन यांनी पहिल्या सामन्यात आणि ख्रिस वोक्सने लॉर्ड्सच्या दुसऱ्या सामन्यात योगदान दिले. त्याचप्रमाणे पंड्याकडूनही अपेक्षा आहेत. एका रात्रीत तो कपिल देव बनू शकत नाही.”
स्टोक्सने पहिल्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
तर सॅम करनने पहिल्या सामन्यात आणि ख्रिस वोक्सने दुसऱ्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात चमकदार कामगिरी करताना सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.
पंड्याने आत्तापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 32.71 च्या सरासरीने 458 धावा केल्या आहेत तर 39.30 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत.
याआधीही दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू शॉन पोलाक यांनी हार्दिकला एकाच क्षेत्रात लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी सांगितले होते की हार्दिकने स्वत:ला कसा पाहतो ते ठरवावे म्हणजे तो गोलंदाजीही करता येणारा फलंदाज आहे की फलंदाजी करता येणारा गोलंदाज आहे हे ठरवावे.
यावर हार्दिकने उत्तर दिले होते की, “जर मी फलंदाजी करत असेल तर मी फलंदाज म्हणून विचार करतो आणि जर मी गोलंदाजी करत असेल तर गोलंदाजासारखा विचार करतो. माझी विशेष अशी एकच भूमिका नाही.”
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–म्हणून होत आहे स्टीव्ह स्मिथचे कौतुक
–तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल
–सचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा?