दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात शनिवारी (18 फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुरू झाला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या रेणुका सिंग ठाकूर हिने शानदार गोलंदाजी करत पाच बळी आपल्या नावे केले. यासोबतच तिने एक विक्रमही आपल्या नावे केला.
पहिल्या दोन सामन्यात रेणुकाला फारशी चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. मात्र, या सामन्यात तिने ते अपयश भरून काढले. तिने पहिल्याच षटकात डॅनी वॅटला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर सोफी डंकली व एलिस कॅप्सी यांना बाद करत तिने इंग्लंड संघाला संकटात टाकले. त्यानंतर डावातील अखेरचे षटक टाकण्यासाठी आल्यानंतर तिने एमी जोन्स व कॅथरीन सिव्हर ब्रंट हिला बाद करत आपले पाच बळी पूर्ण केले. आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये तिने 15 धावा दिल्या.
Innings Break!
An outstanding 5️⃣-wicket haul from Renuka Singh Thakur 🙌🙌
Target for #TeamIndia – 152
Scorecard 👉 https://t.co/EvGQ5Eom80#T20WorldCup | #ENGvIND pic.twitter.com/4PWxkcri0E
— BCCI Women (@BCCIWomen) February 18, 2023
भारतीय महिला संघाकडून टी20 क्रिकेटमध्ये केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी झुलन गोस्वामीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केवळ 11 धावांमध्ये पाच फलंदाजांना बाद केलेले. तसेच, इंग्लंडविरुद्ध टी20 विश्वचषकात कोणत्याही देशाच्या गोलंदाजांनी केलेली ही सर्वात्कृष्ट आकडेवारी ठरली.
इंग्लंडच्या डाव्याचा विचार केल्यास तीन प्रमुख फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर नॅट सिव्हरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिने आक्रमक अर्धशतक झळकावले. तर, कर्णधार हिदर नाईटने 28 व एमी जोन्सने 40 धावांचे योगदान दिले. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट उपांत्य फेरीत आपली जागा पक्की करेल.
(Renuka Singh Thakur Take Fifer Against England In Womens T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इमर्जन्सीमध्ये संघात आला आणि विराटची ‘ड्रीम विकेट’ घेऊन गेला, कुह्नेमनचे दमदार पदार्पण
जबरदस्त! जिमी अन् ब्रॉडचा जागतिक क्रिकेटमध्ये राडा, मोडला वॉर्न-मॅकग्रा जोडीचा ‘तो’ World Record