वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात महिला खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडताना दिसला. पुरुष आयपीएल प्रमाणेच महिला आयपीएलमध्ये देखील संघ खरेदी केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने लिलावात उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या एका तासाच्या आत त्यांनी पाच अत्यंत प्रभावी खेळाडूंना आपल्या ताब्यात सामील करून घेत संघाची मजबूत बांधणी केली. भारतीय महिला संघाची युवा वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर सिंग हे देखील आरसीबीचा भाग बनली. तिच्या लिलावानंतर तिच्या गावी कुटुंबाने मिठाई वाटून आनंद साजरा केला.
▶️ Not just from South Africa, we have s̐̈w̐̈e̐̈e̐̈t̐̈ reactions from Himachal too! Here's Renuka Singh's family she was picked by RCB at INR 1.5CR. #WPLAuction pic.twitter.com/BbV40stApL
— JioCinema (@JioCinema) February 13, 2023
सध्या भारतीय महिला संघाची सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेल्या रेणुका ठाकूर हिच्यावर सर्व संघांची नजर होती. मागील महिन्यात तिला आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला. त्यामुळे तिच्यावर या लिलावात मोठी बोली लागणार अशी शक्यता वर्तवली गेलेली. सुरुवातीपासूनच आरसीबीने तिला आपल्या संघात घेण्यासाठी चंग बांधलेला दिसला. मुंबई व युपीला मागे टाकत आरसीबीने दीड कोटी रुपयांची रक्कम तिच्यासाठी मोजली.
Renuka Singh Thakur's mother distributed sweets after she was picked in the WPL auction, by RCB. pic.twitter.com/bdPQKCxReE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 13, 2023
आपल्या मुलीला मिळालेली ही रक्कम पाहून तिच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. शिमला येथे तिच्या घरी तिच्या आईने मिठाई वाटून हा आनंद साजरा केला.
आरसीबीने या लिलावात जबरदस्त कामगिरी करताना स्मृती मंधाना, सोफी डिवाईन, एलिस पेरी व रिचा घोष या सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असलेल्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले.
(Renuka Singh Thakur’s mother distributed sweets after she was picked in the WPL auction, by RCB)






