---Advertisement---

कॅस्टेलच्या गोलमुळे जमशेदपूरची ओडिसावर मात

On: मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019 10:00 PM
---Advertisement---

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये नवे नाव धारण केलेल्या ओडिसा एफसीला सलामीच्या सामन्यात जमशेदपूर एफसीने 2-1 असे हरविले. रेड कार्डमुळे एक खेळाडू कमी होऊनही जमशेदपूरने विजय नोंदविला. पाच मिनिटे बाकी असताना स्पेनच्या सर्जिओ कॅस्टेल याने केलेला गोल निर्णायक ठरला.’

पूर्वार्धात एका गोलची बरोबरी होती. 17व्या मिनिटाला यजमान संघाने खाते उघडले होते. फारुख चौधरीने हा गोल केला. मध्यंतरास पाच मिनिटे बाकी असताना ओडिसाने स्पेनच्याच अरीडेन सँटानाने ओडिसाला बरोबरी साधून दिली होती.

जमशेदपूर एफसीचा गेल्या मोसमात प्ले-ऑफमधील प्रवेश थोडक्यात हुकला होता. त्यानंतर त्यांनी मोहीमेला विजयी सुरवात करून घरच्या मैदानावर निर्णायक विजयाचे तीन गुण वसूल केले.

खाते उघडण्याची शर्यत जमशेदपूरने जिंकली. न्यो ऍकोस्टा याने पूर्वार्धाच्या प्रारंभी उजवीकडून आगेकूच केली. त्याने मैदानालग मारलेला क्रॉस शॉट रोखण्याचा प्रयत्न ओडिसाचा बचावपटू राणा घरामी याने केला, पण त्याला सफाई दाखिता आली नाही. चेंडू त्याच्या पायाला लागून गोलरक्षकाला चकवून नेटमध्ये गेला.

आघाडी घेऊनही जमशेदपूरला धसमुसळा खेळ भोवला. 34व्या मिनिटाला पिटीने फ्री किकवर मारलेला चेंडू खेळाडूंच्या वॉलला लागला. जेरी माहमिंगथांगाने प्रतिआक्रमण रचण्याचा प्रयत्न केला, पण जमशेदपूरच्या बिकाश जैरूने मैदानावर घसरत बॉक्सजवळ त्याला पाडले. त्यामुळे जैरूला रेड कार्ड दाखविण्यात आले. एक खेळाडू कमी झाल्याचा जमशेदपूरला लवकरच फटका बसला. 40व्या मिनिटाला जेरी माहमिंगथांगाने जोरदार चाल रचत उजवीकडून सँटानाला पास दिला. सँटानाने मग सफाईदार फिनीशिंग केले.

पहिला प्रयत्न ओडिसाने चौथ्या मिनिटाला केला. मार्कोस टेबारने डावीकडून मध्य रेषेजवळ जमशेदपूरचा मध्यरक्षक पिटी याला रोखले. पिटीने आक्रमण क्षेत्रात चेंडू मारला, पण ओडिसाच्या बचाव फळीने क्षेत्र सुरक्षित राखले.

पुढच्याच मिनिटाला जमशेदपूरने मुसंडी मारत ओडिसावर दडपण आणले. ओडिसाचा मध्यरक्षक विनीत रायने 30 यार्ड क्षेत्राजवळ जमशेदपूरच्या सर्जिओ कॅस्टेलला फाऊल केले. त्यामुळे मिळालेली फ्री कीक मात्र फलदायी ठरली नाही.

सातव्या मिनिटाला ओडिसाचा मध्यरक्षक नारायण दासने जमशेदपूरच्या अनिकेत जाधवला कॉर्नर फ्लॅगपाशी धसमुसळ्या खेळाद्वारे रोखले. त्यामुळे मारलेली फ्री कीक पिटीने घेतली आणि नेटच्या दिशेने फटका मारला, पण ओदीशाचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याने चपळाईने थोपविलेला चेंडू बारवरून बाहेर गेला.

दुसऱ्या सत्रात ओडिसाच्या नंदकुमार शेखरने सँटानाला पास देत बॉक्समध्ये घोडदौड केली, पण जमशेदपूरच्या जॉयनर लॉरन्कोने त्याला रोखले. या सत्राच्या प्रारंभीच जमशेदपूरने ऍकोस्टाऐवजी हुकमी खेळाडू मेमोला बदली खेळाडू म्हणून उतरविले. त्यानंतर अर्धा तास बाकी असताना अनिकेत जाधव याच्याऐवजी सुमित पासीला आणले.

जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉलने 76व्या मिनिटाला जेरी माहमिंगथांगाचा प्रयत्न फोल ठरविला. त्यामुळे मिळालेला कॉर्नरही वाया गेला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---