यंदाची चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असेल. या मेगा स्पर्धेची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होईल. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. दरम्यान भारतीय संघाने तिथे सरावाला देखील सुरूवात केली आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की या मेगा स्पर्धेसाठी भारतीय संघ ज्या खेळपट्ट्यांवर खेळणार आहे, त्या खेळपट्ट्या कशा असतील?
दुबईमध्ये भारत ज्या खेळपट्ट्यांवर सामने खेळेल त्या संथ असतील आणि फिरकीपटूंना तिथे खूप मदत मिळेल अशी अपेक्षा होती. तथापि, आता असे दिसून येत आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2 नवीन खेळपट्ट्या वापरल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत भारतीय संघाला खूप संथ खेळपट्टीवर खेळावे लागणार नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये एकूण 10 खेळपट्ट्या आहेत, त्यापैकी 2 खेळपट्ट्यांवर एकही सामना खेळला गेला नाही आणि त्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या महिला टी20 विश्वचषकापासून या मैदानावर बरेच क्रिकेट खेळले गेले आहे.
या मैदानावर 19 वर्षांखालील आशिया कप देखील खेळवण्यात आला. यानंतर, येथे आंतरराष्ट्रीय लीग टी20 देखील आयोजित करण्यात आली आहे. या लीगचे 13 ग्रुप स्टेज सामने दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आले, परंतु यादरम्यान 2 खेळपट्ट्यांचा वापर करण्यात आला नाही.
पीटीआयच्या अहवालानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान कमी वेळात सामना खेळण्यायोग्य बनवण्यासाठी 2 खेळपट्ट्यांना हात लावू नये असा संदेश आधीच देण्यात आला होता. त्या दोन्ही खेळपट्ट्या ILT20 प्लेऑफमध्ये वापरल्या गेल्या होत्या की नाही? याबद्दल अजूनही शंका आहे.
दुबईचे मैदान नेहमीच संथ खेळपट्टी म्हणून ओळखले जाते आणि येथे फार मोठी धावसंख्या उभारली जात नाही. अशा परिस्थितीत, जर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संथ विकेट मिळाल्या तर प्रेक्षकांचा उत्साह कमी होऊ शकतो. केवळ 19 सामन्यांच्या या स्पर्धेतला एकही सामना कंटाळवाणा किंवा खूप कमी धावसंख्या असलेला असावा असे आयसीसीला अजिबात वाटणार नाही. अशा परिस्थितीत, भारताला दुबईमध्ये सामने खेळण्यासाठी चांगल्या विकेट मिळतील याची सतत खात्री केली जात आहे.
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक) हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानने ओलांडले नीचपणाच्या सर्व मर्यादा, कराची-लाहोर स्टेडियममध्ये भारतीय ध्वज नाही…
जसप्रीत बुमराह की रिषभ पंत… भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कोणाला मिळणार?
WPL 2025: गुजरातचा दणका UP वॉरियर्सचा दारुण पराभव, कर्णधाराची निर्णायक खेळी






