इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या हंगामात अनेक संघांमध्ये बरेच बदल दिसणार आहेत. त्यातच चेन्नई सुपर किंग्जमधील (सीएसके) बदलाबाबत अधिक चर्चा सुरू आहे. संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजा सीएसकेकडून खेळणार नाही. कारण कर्णधारपदाच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याच्यात आणि व्यवस्थापकांचे संबंध बिघडले होते आणि त्यामुळे त्याला पुढील वर्षाच्या आयपीएलसाठी रिटेन केले जाणार नाही, अशा चर्चांना पेव फुटले होते. त्यावर आता धोनीने पूर्णविराम लावला आहे.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadea) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात मुकला. त्यातच तो आयपीएलचा 16वा हंगाम सीएसकेकडून खेळणार नाही अशा चर्चा सुरू झाल्या. यावर आता कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) स्पष्टीकरण दिले. माध्यमांमधील रिपोट्सनुसार, जडेजाला चेन्नई संघात कायम ठेवण्यासाठी धोनीने व्यवस्थापकांशी बोलणी केली.
आयपीएल 2022च्या हंगामात जडेजाने धोनीच्या जागी चेन्नईचे नेतृत्व केले होते. तेव्हा संघाच्या लागोपाठ पराभवानंतर त्याने पुन्हा एकदा धोनीकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. काही रिपोर्ट्नुसार सीएसके आणि जडेजा यांच्यातील संबंध बिघडले, मात्र यावर दोन्ही पक्षाकडून कोणतेच विधान आले नव्हते. आता त्यांच्यात सर्व सुरळीत असल्याचे समजते.
जडेजाला संघात कायम ठेवण्यासाठी धोनीने व्यवस्थापकांशी बोलणी केल्याचे समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, धोनीच्या मते जडेजाची जागा कोणताही खेळाडू भरून काढू शकत नाही. यामुळे धोनीने व्यवस्थापकांना स्पष्ट केले की जडेजाला कोणत्याही किमंतीवर रिटेन करायचेच.
जडेजा सीएसकेसोबत 2012पासून आहे. त्याने संघासोबत 2018 आणि 2021मध्ये दोन आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्याने आयपीएलच्या कारकिर्दीत 210 सामने खेळताना 2502 धावा केल्या असून 132 विकेट्स घेतल्या. चेन्नईबरोबरच त्याने राजस्थान रॉयल्स, कोची टस्कर्स केरला आणि गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले.
कोरोनामुळे मागील तीन वर्ष आयपीएल हंगामील सामने संघांनी घरच्या मैदानावर खेळले नाही, मात्र 2023चा हंगाम होम-अवे म्हणजे पहिल्या सारखा खेळला जाणार आहे. तसेच 2023च्या आयपीएलमधील सहभागी 10 संघांना ज्या खेळाडूंना रिटेन करायचे आहे, त्या 10 खेळाडूंची यादी15 नोव्हेंबरपर्यंत द्यायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आधी आम्ही सचिनसोबत खेळायचो, पण आता विराटसोबत खेळतोय’, भारताच्या माजी दिग्गजाने केली तुलना
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय