टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. कारण दोन खेळाडू विश्वचषक सोडून मायदेशी परतणार आहेत. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने चांगली कामगिरी केले आहे, ज्यामुळे सुपर-8 साठी भारतीय संघ पात्र ठरला आहे. सलग तीनही सामने जिंकून टीम इंडिया ‘अ’ गटात अव्वल स्थानी आहे.या दरम्यान टीम इंडियासाठी वाईट बातमी समेर येत आहे.
विश्वचषकापूर्वी भारतीय निवड समतीने 15 सदस्यीय संघासह 4 राखीव खेळाडूंची घोषणा केली होती. त्या राखीव मधील दोन खेळाडू भारतविरुद्ध कॅनडा सामन्यानंतर मायदेशी परतणार आहेत. ज्यामध्ये शुबमन गिल आणि आवेश खान या खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयने अमेरिका येथे होणाऱ्या फक्त चार सामन्यांसाठी गिल आणि आवेशची राखीव खेळाडू मध्ये निवड केली होती. ज्यामुळे आता त्यांना भारतात परतावे लागणार आहे.
टीम इंडियाचे मागील तीनही सामने न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे झाले. फलंदाजीस अव्हानात्मक असलेल्या या खेळपट्टीवर भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले. भारतीय खेळाडूंनी गोलंदाजीत भेदक कामगिरी करत तीनही सामन्यात सामनाविराचा पुरस्कार वेगवान गोलंदाजानी पटकावले आहे.
भारतीय संघ कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर सुपर-8 फेरी साठी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. रिंकू सिंग मात्र टीम इंडियासाठी राखीव खेळाडू म्हणून संघात सामील असणार आहे, तर खलील अहमद बद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. भारतीय संघ 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध सुपर-8 मधील पहिला सामना खेळणार आहे. तर 24 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बहुचर्चीत सामना वेस्ट इंडिज येथील सेंट लूसिया येथे होणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
पापुआ न्यू गिनीविरुद्ध अफगाणिस्तानचा शानदार विजय, सुपर-8 मध्ये मिळाला प्रवेश!
इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रुट एमबीई पुरस्कारानी सन्मानित
पाकिस्तान किंवा श्रीलंका नसून, ‘हा’ आहे आशियातील सर्वोतम दुसरा संघ, नाव ऐकून तूम्ही पण व्हाल अचंबित!