मंगळवारी (3 ऑक्टोबर) इराणी चषक 2023 रेस्ट ऑफ इंडियाने जिंकला. या सामन्यात सौराष्ट आणि रेस्ट ऑफ इंडिया संघ आमने सामने होते. रणजी ट्रॉफीचा गतविजेता संघ सौराष्ट्र इराणी चषकात 175 धावांनी पराभूत झाला. पहिल्या डावात 4, तर दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेणारा सौरभ कुमार (Saurabh Kumar) सामनावीर ठरला.
यावेळी इराणी चषकात रेस्ट ऑफ इंडियाचे कर्णधारपद हनुमा विहारी (Hanuma Vihari) याच्याकडे होते. विहारीच्या नेतृत्वात इंडियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियाची धावसंख्या 308, तर सौराष्ट्र संघाची धावसंख्या 212 होती. पहिल्या डावात मिळालेली आघाडी रेस्ट ऑफ इंडियाला दुसऱ्या डावात जास्त मोठी बनवता आली नाही. दुसऱ्या डावात रेस्ट ऑफ इंडिया संघ अवघ्या 160 धावा करून सर्वबाद झाला. परिणामी सौराष्ट्रला विजयासाठी 255 धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात रेस्ट ऑफ इंडिया आणि सौराष्ट्र संघ झटपट बाद झाल्यामुळे सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (3 ऑक्टोबर) लागला. (Rest of India won the Irani Cup 2023)
???????????????? ???????????????????????????? ????????????????????????????! ????
Rest of India Captain Hanuma Vihari lifts the @IDFCFIRSTBank #IraniCup ???????? pic.twitter.com/LGK1BbFmtx
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 3, 2023
रेस्ट ऑफ इंडियासाठी यावर्षी कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या हनुमा विहारीसाठी देखील चालू वर्ष खास ठरले. त्याने याच वर्षी कर्णधार म्हणून त्याने जुलै 2023 मध्येच मानाची दुलीप ट्रॉफी जिंकली होती. साऊथ झोनसाठी नेतृत्व करणाऱ्या विहारीने अंतिम सामन्यात वेस्ट झोनला 75 धावांनी मात दिली होती.
उभय संघांतील या साम्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियासाठी सलामीवीर साई सुदर्शन याने 72 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याव्यतिरिक्त संघातील एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. सौराष्ट्रसाठी या डावात पार्थ भुत (Parth Bhut) याने 5 विकेट्स घेतल्या, तर धर्मेंद्रसिंग जडेजा याने 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्र संघासाठी एकट्या अर्पित वसावडा (54) याने अर्धशतक केले. दुसरीकडे रेस्ट ऑफ इंडियासाठी सौरभ कुमार याने 4, विद्वथ कवेरप्पा याने 3, तर शम्स मुलानी याने महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात रेस्ट ऑफ इंडिया संघासाठी सलामीवीर साई सुदर्शन आणि मयांक अगरवाल यांनी अनुक्रमे 43 आणि 49 धावांची खेळी केली. पण त्यांचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. पार्थ भुत याने पुन्हा एकदा चेंडूने कमाल दाखवत 7 विकेट्स घेतल्या आणि रेस्ट ऑफ इंडियाला स्वस्तात (160) गुंडाळले. धर्मेंद्रसिंग जडेजा यानेही 3 विकेट्स घेतल्या. विजयासाठी सौराष्ट्रला 255 धावा हव्या होत्या. पण संघ अवघ्या 79 धावा करून सर्वबाद झाला. सौराष्ट्रला स्वस्तात गुंडाळण्यासाठी सौरभ कुमार आणि शम्स मुलानी ही जोडी पुन्हा एकदा फायद्याची ठरली. सौरभने शेवटच्या डावात 6, तर शम्सने 3 विकेट्स नावावर केल्या.
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । भारताचे अजून एक पदक निश्चित, अभय आणि अनाहतची स्क्वॉश दुहेरीत चमकदार कामगिरी
World Cup Countdown: वर्ल्डकप इतिहासात दिलशान-थरंगाची जोडी नंबर वन, 12 वर्षांपूर्वी रचलेला इतिहास