---Advertisement---

IND vs AFG । रिटायर्ड आऊट कि रिटायर्ड हर्ट? रोहित शर्माचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात

On: शुक्रवार, जानेवारी 19, 2024 5:59 PM
Rohit Sharma
---Advertisement---

IND vs AFG Rohit Sharma : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामना चांगलाच गाजला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात रोहितने वर्ल्ड रेकॉर्ड केला. रोहितने नाबाद 121 धावांची विस्फोटक खेळी केली. या जोरावर टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 212 धावा केल्या.

धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघानेही जोरदार खेळ केला. त्यांनीही बरोबर 212 धावा केल्याने सामना टाई झाला. या सामन्यात फूल ड्रामा पहायला मिळाला. तब्बल दोन वेळा सुपर ओव्हरही खेळवावी लागली. टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 मध्ये अफगाणिस्तानचा डबल सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांना 16-16 धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 11 धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने तीन चेंडूत दोन विकेट पडल्या आणि टीम इंडियाने विजय निश्चित केला. पण चर्चा मात्र रोहितच्या फलंदाजी करण्यावरूनच झाली.

रिटायर्ड आऊट कि रिटायर्ड हर्ट???
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये झालेल्या दोन्ही सुपर ओव्हर्समध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी केली. नियमानुसार पहिल्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केलेल्या फलंदाजाला पुढच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करता येत नाही. तरीही रोहित दूसऱ्या सुपर ओव्हरला फलंदाजीस आलेला दिसला. रोहित रिटायर्ड आऊट झाला होता, ना कि रिटायर्ड हर्ट असे पंचांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ताे फलंदाजीस आलेला दिसला. (Retired Hurt Or Retired Out? Rohit Sharma’s Super Over Decision Triggers Debate)

काय आहे रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्ट मधला फरक???
रिटायर्ड आऊट म्हणजे जेव्हा फलंदाज स्वेच्छेनं मैदान सोडतो आणि दुसऱ्या फलंदाजाला मैदानात येण्याची संधी देतो. तर,
रिटायर्ड हर्ट म्हणजे एखादा खेळाडू किंवा फलंदाज क्रॅंप आल्याने किेवा दूखापतग्रस्त झाल्याने मैदान सोडून जातो, त्यावेळी तो रिटायर्ड हर्ट मानला जातो.

वाचा आणखी बातम्या –
T20 वर्ल्डकपसाठी 15 शिलेदार फिक्स? शतकी खेळी केल्यानंतर स्वतः रोहितकडून मिळाले संकेत
Australian Open 2024 : सुमितने ऑस्ट्रेलियात गाजवले मैदान, तब्बल 35 वर्षांनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---