भारतीय संघाला आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी शेवटची टी-20 मालिका अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची होती. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही टी-20 मालिका बुधवारी (17 जानेवारी) निकाली निघाली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चाहत्यांच्या पुढची अनेक वर्ष लक्षात राहण्यासारखा झाला. या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्मा याने आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची प्रतिक्रिया दिली.
भारत आणि अफागणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील हा तिसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. सामना जिंकण्यासाठी भारताला एक नाही तर दोन सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात दोन सुवर ओव्हर खेळवण्याची ही पहिलीच वेळ होती. 69 चेंडूत 121* धावांची वादळी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. भारताने मालिकेतील तिन्ही सामने जिंकले असून अफगाणिस्तान संघाला क्लीन स्वीप (3-0) दिला. भारताला आता पुढचा टी-20 सामना थेट आयसीसी विश्वचषक स्पर्धेत खेलायचा आहे. दरम्यानच्या काळात संघ एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार नसला, तरी इंडियन प्रीमियर लीग खेळली जाणार आहे. आयपीएल 2024मधून विश्वचषकासाठी काही खेळाडू निवडले जाऊ शकतात. पण रोहितच्या माहितीनुसार संघ व्यवस्थापन आतापासूनच काही खेळाडूंचा विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर विचार करत आहे.
अफगाणिस्तानला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात दिल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ निश्चित केला नाहीये. पण आमच्या डोक्यात 8-10 खेळाडू आहेत. आम्ही परिस्थिती पाहून संघ निवडू. वेस्ट इंडीजमधील खेळपट्टी संथ गतीची आहे, त्यामुळे त्या पद्धतीने संघ निवडला जाईल.” दरम्यान, रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध बुधवारी कारकिर्दीतील पाचवे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक ठरले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक शतके करणारा फलंदाज देखील ठरला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर 20 षटकांमध्ये दोन्ही संघांना 212-212 धावा केल्या होत्या. यानंतऱ उभय संघांमध्ये पहिली सुपर ओव्हर खेळली गेली. यामध्ये दोन्ही संघांनी 16-16 धावा केल्या आणि सामना पुन्हा एकटा टाय झाला. शेवटच्या सुपर ओव्हरमध्ये मात्र भारताने प्रथम फलंदाजी करताना 11 धावा केल्या. प्रत्युत्तारत अफगाणिस्तान संघाने अवघी 1 धावा करून दोन्ही विकेट्स गमावल्या. (Rohit Sharma gave important hints about T20 World Cup 2024)
महत्वाच्या बातम्या –
Virat Kohli । नको तेच झालं, पहिल्यांदाच विराटवर ओढावली ‘ही’ नामुष्की
IND vs AFG सामना टाय झाल्यानंतर विराटचा झाला ‘मोये मोये’, लाईव्ह सामन्यातील डान्स व्हायरल