Brendan Taylor 10000 runs: निवृत्तीच्या, 4 वर्षांनंतर पुनरागमन आणि त्यानंतर एक मोठा रेकाॅर्ड. झिम्बाब्वेचा दिग्गज फलंदाज ब्रेंडन टेलरची कहाणी खूपच रंजक आहे, जो सध्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत (SL vs ZIM ODI Series) व्यस्त आहे. टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा झिम्बाब्वेचा तिसराच खेळाडू बनला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 20 धावा करताना त्याने हा पराक्रम केला. (Zimbabwe cricketer comeback story)
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी ब्रेंडन टेलरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9,989 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यात केवळ 11 धावा करताच तो 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा झिम्बाब्वेचा तिसरा फलंदाज बनला. दुसऱ्या सामन्यात 20 धावांच्या खेळीनंतर टेलरच्या एकूण धावा 10,009 झाल्या आहेत. या बाबतीत त्याच्या पुढे फक्त ग्रँट फ्लॉवर आणि अँडी फ्लॉवर आहेत. ग्रँटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10,028 धावा केल्या होत्या, तर अँडीने 11,580 धावा केल्या होत्या. (Zimbabwe cricket legends stats)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचे टॉप 3 फलंदाज:
अँडी फ्लॉवर – 11,580 धावा
ग्रँट फ्लॉवर – 10,028 धावा
ब्रेंडन टेलर – 10,009 धावा
ब्रेंडन टेलरने पहिली निवृत्ती 2015 मध्ये घेतली होती. कोलपाक डील अंतर्गत इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. काही वर्षांनंतर त्याने निवृत्तीचा निर्णय बदलून 2018 मध्ये झिम्बाब्वे संघात पुनरागमन केले. त्यानंतर, त्याने 2021 मध्ये दुसऱ्यांदा निवृत्ती घेतली. 2021 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने आयसीसीने त्याला साडेतीन वर्षांची बंदी घातली होती. साडेतीन वर्षांची बंदी पूर्ण केल्यानंतर त्याने 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. (Brendan Taylor Comeback)
ब्रेंडन टेलरने 4 वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन केले, परंतु पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. दुसऱ्या सामन्यात त्याने 20 धावा केल्या, पण याच खेळीदरम्यान त्याने 10,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला. (Brendan Taylor 10000 runs international cricket)






