लॉर्ड्सवर इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पुन्हा एकदा मैदानावर तेच दृश्य दिसले, जे पहिल्या कसोटी सामन्यात दिसले होते. गोलंदाजीदरम्यान मोहम्मद सिराज याने उत्साहात आपला संयम गमावला आणि भारतीय संघाने एकापाठोपाठ सलग दोन रिव्ह्यू गमावले. यानंतर सिराज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
तर झाले असे की, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाता खेळ सुरू होता. इंग्लंडचा संघ भारताच्या ३६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. सलामीवीर डोमिनिक सिबली आणि हसीब हमीद यांच्या विकेट गमावल्यानंतर कर्णधार जो रूट फलंदाजीला आला होता. ते खेळत असताना भारताचा वेगवान गोलंदाज सिराजने २ वेळा रिव्ह्यू घेतले. दोन्ही वेळा सिराजने पायचित विकेटसाठी अपील केली आणि पंचांनी नकार दिला. रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसऱ्या पंचांनीही रिव्ह्यू फेटाळून लावत इंग्लंडकडून निर्णय दिला. यामुळे भारताने त्यांचे २ रिव्ह्यू गमावले.
जर सिराज आणि डीआरएसबद्दल विचार केला तर, ही आकडेवारी भारतीय चाहत्यांना निराश करणारी आहे. आतापर्यंत, सिराजने त्याच्या गोलंदाजीदरम्यान १० वेळा रिव्ह्यू घेतले आहेत आणि त्याचा फक्त एकदाच रिव्ह्यू खरा ठरला आहे. तर त्याच्यामुळे संघाला ७ वेळा रिव्ह्यू गमवावा लागला आहे.
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1426213677728878604?s=20
2 reviews burnt in 2 overs😂😂#INDvENG pic.twitter.com/8Yqg7xYwy3
— JC (@jc_writes_) August 13, 2021
https://twitter.com/aqqu___/status/1426215040886075398?s=20
सिराजने लॉर्ड्सवर गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. पण दोन चुकीचे डीआरएस घेण्यात भूमिका बजावली. यामुळे चाहते त्याला खूप ट्रोल करत आहेत.
असे असले तरीही, भारतीय वेगवान गोलंदाज सिराजने दुसऱ्या दिवशी इंग्लंडला सलग दोन धक्के देत भारताला मजबूत स्थितीत आणले आहे. त्याने सलामीवीर सिबलीला ११ धावांवर झेलबाद केले. तर ५ वर्षांनंतर इंग्लंड कसोटी संघात पुनरागमन करत असलेल्या हमीदला शून्यावर त्रिफळाचीत केले आहे. दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंड संघ ३ बाद ११९ धावा अशा स्थितीत आहे. अजून त्यांना आघाडी घेण्यासाठी २४५ धावांचा टप्पा पार करायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या मोठ्या भावाची प्रकृती अस्थिर, रुग्णालयात केलं भरती
‘रहाणे आणि पुजारा असे खेळाडू आहेत, ज्यांना संघाबाहेर केलं तरी ते काही बोलणार नाहीत’
मैं तो नागिन नागिन… लॉर्ड्सच्या बाल्कनीत कोहलीने धरला ठेका, सहकाऱ्यांना हसू अनावर