भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियन संघाच्या डावातील 9 षटके झाल्यानंतर पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलिया समोरील आव्हान बदलले. आता ऑस्ट्रेलिया संघाला 33 षटकात 317 धावांचे आव्हान मिळाले आहे.
भारताने दिलेल्या चारशे धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच षटकात दोन धक्के बसले. प्रसिद्ध कृष्णा याने मॅथ्यू शॉर्ट व स्टीव्ह स्मिथ यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मार्नस लॅब्युशेन यांनी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 9 षटकात 56 पर्यंत नेले. त्यानंतर पाऊस आल्यामुळे जवळपास एक तासापेक्षा जास्त खेळ वाया गेला. पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर डकवर्थ लुईसचे नवे नियम लागू केले.
त्यानुसार ऑस्ट्रेलियाला आता उर्वरित 24 षटकांमध्ये 261 धावा कराव्या लागतील. भारताचा एक गोलंदाज अधिकाधिक सात षटके टाकू शकतो.
(Revise Playing Condition In India Australia Australia need 317 In 33 Overs)
महत्वाच्या बातम्या –
इंदोरमध्ये टीम इंडियाकडून धावांची बरसात! ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचे लक्ष
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद