महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटना, एकता युवक विकास मंडळ आणि पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य क्लोज्ड स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत रेयांश कारिया, हृदान शहा अनिका दुबे, रेवा निंबाळकर क्रिश डेंबला व अविनाश यादव यांनी आपापल्या गटात मानांकित खेळाडूंचा पराभव करत विजेतेपद पटकावले
द वेस्टीन हॉटेल, कोरेगाव पार्क आणि आरएसआय क्लब कॅम्प येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 11 वर्षांखालील मुलांच्या गटात दुस-या मानांकित रेयांश कारिया याने अव्वल मानांकित बुरहान भानपुरवालाचा 7-11, 11-6, 8-11, 11-5, 11-8 असा पराभव करत विजेतेरपद पटकावले. मुलींच्या गटात अव्वल मानांकित मान्या संघवीने दुस-या मानांकित गार्गी कदमचा 11-3, 11-4, 11-6 असा पराभव करत विजेतेपद कमावले. 13 वर्षांखालील मुलांच्या गाटत विजेतेपदाच्या लढतीत आदित्य घोडकेने हर्ष जोशीचा 11-3, 11-6, 11-6 असा तकर मुलींच्या गटात अव्वल मानांकित ध्रिष्टी पवारने वसुंधरा नांगरेचा 11-3, 11-2, 11-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात बिगर मानांकित हृदान शहाने तिस-या मानांकित अर्जुन मोरेचा 11-8, 11-8, 11-4 असा तर मुलींच्या गटात बिगर मानांकित अनिका दुबेने चौथ्या मानांकित करीना फिप्सचा 13-11, 12-10, 3-11, 2-11, 11-9 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अधिश कंचरला याने अर्जून सोमानीचा 10-12, 11-1, 11-9, 11-3 असा तर मुलींच्या गटात दुस-या मानांकित रेवा निंबाळकरने अव्वल मानांकित तिशा जसानी 11-1, 10-12, 4-11, 11-7, 11-9 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.
19 वर्षांखालील मुलांच्या गाटत तिस-या मानांकित क्रिश डेंबलाने अव्वल मानांकित लक्ष्य मोतीयाल याचा 11-4, 11-2, 8-11, 11-9 असा तर मुलींच्या गटात अव्वल मानांकित सानिका भानपुरवालाने दिस-या मानांकित आर्या निंबाळकरचा 11-3, 11-3, 11-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
पुरुष गटात चौथ्या मानांकित अविनाश यादवने अव्वल मानांकित पार्थ अग्रवालचा 11-5, 11-6, 11-6 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. अविनाश जिंदल स्क्वॅश अकादमी येथे लक्ष्मण जोशी व जावेद मोहम्मद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतो. मुंबई येथे विद्या विहार विद्यापीठ येथे बी.एस.सी स्पोर्टस् ऑड एक्सरसाईज सायन्सचे शिक्षण घेत आहे. डिसेंबर 2022 रोजी चेन्नई येथे होणा-या सिनीयल नॅशनल स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. महिलांच्या गटात अव्वल मानांकित सुनीता पटेलने श्रेया कोल्हेचा 11-1, 11-1, 11-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
35 वर्षावरील गटात अव्वल मानांकित संजय पवारने बेंजामीन नेदरापल्लीचा 11-2, 11-1, 11-5 असा पराभव केला. 45 वर्षावरील गटात दुस-या मानांकित विनय राऊथन याने अशुन बहलचा 11-1, 11-8, 11-7 असा तर 55 वर्षावरील गटात समीर खरेने ललीत कुमार अग्निहोत्रीचा 12-10, 11-7, 11-5 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांडरे, एमएसआरएचे सरचिटणीस व एमओचे सहसचिव दयानंद कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव आनंद लाहोटी, अमित जंजानी, यतीन म्हात्रे, दत्तात्रय थाणगे, नितीन थाणगे, विवेक साहू,ya आशा शिंदे, प्रिती काळे, स्पर्धा संचालक सतीश पोतदार, विकास राठोड, सरबजीत सिंग बग्गा, गणेश तांबे, हिम्मत सिंग भाटी, कुमान सिंग भाटी, गोविंद सिंग, संदीप आर्या, अंशुल गोयल, रोहित हप्पे, मिथुन पोनाप्पा, संजय पवार, रवींद्र नवले, जावेद मोहम्मद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रियांका पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
11 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी:
रेयांश कारिया(2) वि.वि बुरहान भानपुरवाला(1) 7-11, 11-6, 8-11, 11-5, 11-8
11 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी
मान्या संघवी(1) वि.वि गार्गी कदम (2) 11-3, 11-4, 11-6
13 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी:
आदित्य घोडके (5/8)वि.वि हर्ष जोशी(5/8) 11-3, 11-6, 11-6
13 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी:
ध्रिष्टी पवार(1) वि.वि वसुंधरा नांगरे 11-3, 11-2, 11-3
15 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी:
हृदान शहा वि.वि अर्जुन मोरे (3/4) 11-8, 11-8, 11-4
15 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी
अनिका दुबे वि.वि करीना फिप्स (3/4) 13-11, 12-10, 3-11, 2-11, 11-9
17 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी
अधिश कंचरला(3/4) वि.वि अर्जून सोमानी(3/4) 10-12, 11-1, 11-9, 11-3
17 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी
रेवा निंबाळकर(2) वि.वि तिशा जसानी(1) 11-1, 10-12, 4-11, 11-7, 11-9
19 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी
क्रिश डेंबला(3/4) वि.वि लक्ष्य मोतीयाल(1) 11-4, 11-2, 8-11, 11-9
19 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी
सानिका भानपुरवाला(1) वि.वि आर्या निंबाळकर(2) 11-3, 11-3, 11-3
पुरुष: अंतिम फेरी
अविनाश यादव(3/4)वि.वि पार्थ अग्रवाल(1) 11-5, 11-6, 11-6
महिला: अंतिम फेरी
सुनीता पटेल (1) वि.वि श्रेया कोल्हे 11-1, 11-1, 11-1
35 वर्षावरील:अंतिम फेरी
संजय पवार(1) वि.वि बेंजामीन नेदरापल्ली 11-2, 11-1, 11-5
45 वर्षावरील: अंतिम फेरी
विनय राऊथन(2) वि.वि अशुन बहल 11-1, 11-8, 11-7
55 वर्षावरील: अंतिम फेरी
समीर खरे वि.वि ललीत कुमार अग्निहोत्री 12-10, 11-7, 11-5
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा वेगवान गोलंदाज झाला दुखापतग्रस्त, उपचारासाठी बंगळूरूमध्ये दाखल
तिसऱ्या अनधिकृत कसोटीवर इंडिया ए ची पकड; पाटीदारचे आणखी एक नाबाद शतक
वर्ल्डकपआधीच रोहित आणि द्रविडला मिळाली वॉर्निंग! काय आहे संपूर्ण प्रकरण?






