सध्या सुरू असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग लिलावात अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर मोठी बोली लागली. यामध्ये भारतीय संघाची युवा यष्टीरक्षक रिचा घोष हिच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली. मात्र, अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला तिला आपल्याकडे खेचण्यात यश आले. बेंगलोरने तब्बल 1 कोटी 19 लाखांची बोली लावली.
She packs a punch this @13richaghosh! ????
She joins @RCBTweets for INR 1.90 Crore ???? ????#WPLAuction pic.twitter.com/LwpPUdnmwU
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023
रिचा सध्या केवळ वीस वर्षांची असली तरी ती मागील तीन वर्षापासून वरिष्ठ संघाचा भाग आहे. तसेच, नुकत्याच भारतीय महिला संघाने जिंकलेल्या अंडर 19 टी20 विश्वचषकात तिने भारताचे प्रतिनिधित्व केलेले. तसेच सध्या सुरू असलेल्या वरिष्ठ टी20 विश्वचषकात ती खेळताना दिसते.
संघाची फिनिशर म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. विश्वचषकाच्या सराव सामन्यात तिने बांगलादेशविरुद्ध नऊ षटकारांची आतिषबाजी केली होती. तर, पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील पहिल्या सामन्या तिने सलग तीन चौकार खेळून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केलेला. तिच्यासाठी मुंबई व बेंगलोर संघाने चांगलीच बोली लावण्याचा प्रयत्न केला. अखेरीस युपीनेही तिच्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आरसीबीने सर्वात मोठी 1 कोटी 90 लाखांची बोली तिच्यासाठी लावली.
तिच्यासह या संघात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना, न्यूझीलंडची अष्टपैलू सोफी डिवाईन, ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी व भारताची रेणुका ठाकूर यादेखील खेळताना दिसतील.
(Richa Ghosh Sold In 1 Crore 90 Lakhs By RCB)






