---Advertisement---

अद्भुत: कुंबळे आणि लॅकरच्या १० विकेट्स प्रत्यक्ष मैदानावार पाहाणाऱ्या ‘त्या’ माणसाबद्दल माहित आहे काय?

On: रविवार, डिसेंबर 5, 2021 10:24 AM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाला एका डावात ५-६ विकेट्स घेताना पाहणे एक चांगली गोष्ट समजली जाते. मात्र, जर गोलंदाजाने एका डावात सर्व १० विकेट्स घेतल्या तर! तसं विचार केला तर, ही सरळ सरळ अशक्य गोष्ट वाटते. पण कसोटी क्रिकेटला अशी अद्भूत कामगिरी करणारा तिसरा हिरा शनिवारी (४ डिसेंबर) एजाज पटेलच्या रुपात सापडला. त्याच्यापूर्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे असाधारण काम करणारे २ हिरे आहेत. त्यांनी कसोटी सामन्याच्या एका डावात आपल्या गोलंदाजीने विरुद्ध संघाच्या १० फलंदाजांचा पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

यातील पहिले नाव जीम लॅकर. १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ओल्ड ट्रॅफेड, मॅंचेस्टर येथील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी हा पराक्रम केला होता. तर पहिल्या डावात त्यांनी ९ विकेट्स घेतल्या होत्या.

भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

घडला होता खास योगायोग- 
कुंबळे व लॅकर यांचा हा पराक्रम अनेकांनी टेलिव्हीजनच्या माध्यमातून लाईव्ह पाहिला आहे. परंतु एक असा व्यक्ती आहे, ज्याने हे दोन सामने थेट मैदानात पाहिले होते.

जिम लॅकर यांनी जेव्हा या १९ विकेट्स घेतल्या होत्या, तेव्हा एक १० वर्षांचा मुलगा हा ऍशेस मालिकेतील हा सामना पाहण्यासाठी आला होता. त्यानंतर ४३ वर्षांनी व जवळपास १४४३ कसोटी सामन्यानंतर अनिल कुंबळेने डावात १० विकेट्स दिल्ली कसोटीत घेतल्या. यावेळी तो १० वर्षांचा मुलगा ५३ वर्षांचा झाला होता व तो हा सामना स्टेडियमवर पाहण्यासाठी उपस्थित होता.

त्या मुलाच नावं रिचर्ड स्टोक्स. रिचर्ड स्टोक्स हे जर्मनीमध्ये एका कंपनीत काम करत होते व तेव्हा ते कामानिमित्त दिल्ली येथे आले होते. तेव्हा त्यांनी वेळात वेळ काढून या कसोटी सामन्याला हजेरी लावली.

योगायोग म्हणजे या सामन्यात भारतीय संघाचा फिरकीपटू अनिल कुंबळेने १० विकेट्स घेतल्या होत्या. एक प्रेक्षक म्हणून त्यांना ४३ वर्षांच्या अंतराने दुसऱ्यांदा कसोटीत १० विकेट्स पाहण्याचा अनुभव याची देही याचा डोळा घेता आला होता.

विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये डावात केवळ ३ वेळाच असाच पराक्रम झाला आहे व त्यातील पहिले दोन्ही सामने स्टोक्स यांनी मैदानावर जाऊन पाहिले होते. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गमतीचा भाग म्हणजे त्यांनी त्यांच्या पुर्ण जीवनात हे दोनच सामने मैदानावर जाऊन पाहिले होते. आता त्यांनी एजाज पटेलचा देखील पराक्रम मैदानातून पाहिला आहे की नाही, याबद्दल मात्र कोणताही माहिती नाही.

स्टोक्स यांचे वडील हे बी डिव्हिजनमध्ये सरे या काऊंटी क्लबकडून क्रिकेट खेळले होते.

स्टोक्स यांनी मैदानात इतिहास घडताना पाहिल्याच्या अनुभवाबद्दल सांगितले होते की, ‘मी लंच झाल्यानंतर दिल्ली कसोटीत सामना पाहायला गेलो. तेव्हा पाकिस्तान अतिशय सुस्थितीत होता. परंतु मी गेलो आणि कुंबळेने चटकन दोन विकेट्स घेतल्या. मी माझ्या मित्राला सांगितले की, ‘मी कुंबळे व भारतासाठी लक घेऊन आलो आहे. जेव्हा कुंबळेने ६ विकेट्स घेतल्या तेव्हा मी माझ्या मित्राला म्हणालो, की लॅकरच्या १० विकेट्स मैदानावर जाऊन पाहिल्या आहेत. माझा मित्र लगेच मला म्हणाला, की इतिहास पुन्हा घडणार आहे. तेव्हा मी त्याकडे पाहुन स्मितहास्य केले होते.’

महत्त्वाच्या बातम्या – 

एका स्पिनरने घडविलेला इतिहास पाहून दुसरा स्पिनर खूश; अश्विनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

साहेबांनी थोपटली पाठ! एजाजच्या पराक्रमाची शरद पवारांकडूनही दखल, मोजकेच शब्द पण पोटभर कौतुक

…म्हणून पुण्यात ३१ वर्षांपूर्वी झालेला ‘तो’ सामना सचिन तेंडुलकरसाठी ठरला खास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---