आजपासून(८ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज द रोज बॉल स्टेडियम, साऊथँप्टन येथे होणार आहे. पण सध्या पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना सुरु होण्यास विलंब झाला. पण अखेर ३ तास उशीरा सुरु झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात रिचर्ड रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो हे दोघे पंच असणार आहेत. हे दोघेही इंग्लिंश पंच आहेत. त्यामुळे एक खास विक्रम या सामन्यात झाला आहे. १९९३ ला झालेल्या ऍशेज मालिकेतील ६ व्या सामन्यानंतर पहिल्यांदाच दोन इंग्लिंश पंच इंग्लंडच्या कसोटी सामन्यात एकत्र पंच म्हणून काम करणार आहेत.
याआधी शेवटचे १९९३ च्या ऍशेसमधील द ओव्हलवर पार पडलेल्या ६ व्या सामन्यात मर्विन किचन आणि बॅरी मेयर या इंग्लंडच्या दोन पंचांनी पंच म्हणून एकत्र काम केले होते.
सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर तयार करण्यात आलेल्या नवीन नियमानुसार सामन्यासाठी तटस्थ पंच नेमण्याऐवजी आयसीसीच्या स्थानिक पंचांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी इंग्लंडचेच पंच पंचगिरी करताना दिसणार आहेत.
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी मालिकेने ११७ दिवसांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्थगित झाले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
तब्बल ११७ दिवसांनी सुरू झाले क्रिकेट; २५ वर्षात पहिल्यांदाच नाही दिसणार इंग्लंडचा १२वा खेळाडू
संपूर्ण वेळापत्रक: पाकिस्तानपूर्वी इंग्लंड भिडणार ‘या’ संघाशी