---Advertisement---

“रिचर्ड्स, जयसुर्या आणि डिविलियर्सने क्रिकेटला बदलून टाकले”

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 8:00 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam ul Haq)ने म्हटले आहे की, “विंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Viv Richards), श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स (AB de Villiers) हे असे खेळाडू आहेत, ज्यांनी क्रिकेट या खेळाला बदलून टाकले आहे.”

इंजमामने यू-ट्यूब चॅनलवरील व्हि़डिओत म्हटले आहे की, “बर्‍याच वर्षांपूर्वी रिचर्ड्सने क्रिकेटमध्ये बदल घडवला. त्यावेळी फलंदाज वेगवान गोलंदाजांना बॅकफुटवर खेळत असत. पण, रिचर्ड्सने सर्वांना दाखवून दिले की, कसे वेगवान गोलंदाजांना फ्रंटफुटवर खेळता येऊ शकते. तसेच, वेगवान गोलंदाजांवरही आक्रमण करता येऊ शकते.”

“दुसरा बदल जयसूर्याने घडवला. त्याने डावाच्या पहिल्या 15 षटकात वेगवान गोलंदाजांवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. तो क्रिकेटमध्ये येण्यापुर्वी हवेत शॉट मारणाऱ्यांना सामान्यत: फलंदाज समजले जात नसे. पण, जयसूर्याने पहिल्या 15 षटकात इनफील्डच्या वर शॉट मारत फलंदाजांची जुनी व्याख्याच बदलून टाकली.” असे जयसूर्याबद्दल बोलताना इंजमाम म्हणाला.

याबरोबरच डिलिविलियर्स बाबतीत बोलताना तो म्हणाला की, “तिसरा खेळाडू ज्याने क्रिकेटमध्ये बदल घडवला तो डिलिविलियर्स आहे. आजच्या काळात वनडे आणि टी20च्या वेगवान क्रिकेटसाठी मी डिविलियर्सला जबाबदार ठरवतो. पूर्वीचे फलंदाज बॅटने सरळ शॉट खेळत होते. मात्र, डिविलियर्सने पॅडल स्वीप आणि रिवर्स स्वीप मारण्यास सुरुवात केली.” असेही तो पुढे म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---