वनडे विश्वचषक 2023मध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर जगभरात चर्चा सुरू आहेत. अनेक माजी दिग्गज आणि जाणकार भारताच्या पराभवावर मत मांडत आहेत. बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा आपली हुकूमत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखवून दिली. या सगळ्यात रिकी पाँटिंग याचे बीसीसीआयबाबत केलेले वक्तव्य मात्र वादग्रस्त ठरत होते. आता याच वक्तव्याविषयी महत्वाची बातमी हाती येत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात आमने सामने आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 दावा केल्या. प्रत्युत्तारत ऑस्ट्रेलियाने 43 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. भारताच्या पराभवानंतर रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याचे एक वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले होते. एका विश्वसनीय माध्यमाच्या हवाल्याने पाँटिंगचे वक्तव्य या ट्वीटमध्ये लिहिले गेले होते. ट्वीटमध्ये भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचा उल्लेख ‘क्रिकेट माफिया’ असा केला गेला होता.
Ricky Ponting on Fox Cricket:
“This is a win of justice against cricket mafia. Your money and power is still not winning World Cups for you. How embarrassing.”
Ponting owned India and BCCI ???? pic.twitter.com/pc5LnseQi7
— ASG (@ahadfoooty) November 19, 2023
मात्र, माध्यमांतील वृत्तांनुसार पाँटिंगने बीसीसीआयबाबत असे वक्तव्य केले नव्हते. अनेक माध्यमांमध्ये तापासून देखील कुठेच पाँटिंगने बीसीसीआयसाठी ‘क्रिकेटम माफिया’ असा उल्लेख केला नाहीये. अशात व्हायरल ट्वीटमध्ये दिलेले पाँटिंगचे विधान चुकीचे असल्याचे स्पष्ट होते. चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया याबाबत समोर येत आहेत. पाँटिंग ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार असून त्याने 2003 आणि 2007 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले होते.
दरम्यान, यावर्षीचा विश्वचषक भारतात खेळला गेल्याने यजमानपद टीम इंडियाकडे होते. बीसीसीआयने क्रिकेटची ही सर्वात मोठी स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडली, पण भारताला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामन्याआधीचे सर्व 10 सामने मात्र भारताने मोठ्या अंतराने जिंकले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची सुरुवात विश्वचषकात अपेक्षित पद्धतीने झाली नव्हती. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव स्वीकारला होता. पण नंतरच्या सलग 9 सामन्यांमध्ये विजय मिळवत विश्वचषक ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने जिंकली. (Ricky Ponting did not comment on the BCCI statement)
महत्वाच्या बातम्या –
भुवीच्या आंतरराष्ट्रीय करिअरला 33 व्या वर्षीच फुलस्टॉप? टीम इंडियाची दारे ‘या’ कारणाने झाली बंद
अखेर कॅप्टन बवुमा बोललाच! प्रचंड टीकेनंतर म्हणाला, “जेव्हा मी देशासाठी खेळतो…”






