जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या नव्या हंगामात अनेक नवीन नियम देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या नव्या नियमांमुळे स्पर्धा आणखी रंगतदार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. असे असतानाच दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग व मार्गदर्शक सौरव गांगुली यांनी आयपीएलमध्ये वापरण्यात येणाऱ्या इम्पॅक्ट प्लेयर या नव्या नियमाविषयी परस्परविरोधी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आता मी आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर हा नियम प्रथमच पाहायला मिळणार आहे. यामध्ये नाणेफेकीवेळी प्रत्येक संघाचा कर्णधार बाराव्या खेळाडूचे नाव जाहीर करेल. या खेळाडूला चालू सामन्यात दुसऱ्या खेळाडूच्या जागी संघात सामील करून घेता येऊ शकते. मात्र, त्यानंतर पहिला खेळाडू सामन्यात पुन्हा उतरू शकणार नाही. यावेळी हा नियम फक्त भारतीय खेळाडूंसाठी असेल.
याच नियमामुळे गांगुली व पॉंटिंग हे दिग्गज आमने-सामने आले आहेत. या नव्या नियमाबद्दल बोलताना गांगुली म्हणाले,
“नव्या नियमांनी खेळण्यास आम्ही तयार आहोत. मी लोकांच्या मताच्या वेगळे जाऊन म्हणेल की, या नियमांमुळे अष्टपैलू नक्कीच टिकतील. तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही टिकणारच.”
काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग म्हणाले होते की,
“इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अनेक अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होईल. भारतीय खेळाडूंना याचे नुकसान होणार असे असले तरी याचा कितपत फायदा होतो हे पहावे लागेल.”
यापूर्वी देखील अनेक दिग्गजांनी या नियमाला विरोध दर्शवला होता. यामुळे भारतीय खेळाडूंचे एकाच विभागातील योगदान लक्षात राहील, असे अनेकांनी म्हटले.
(Ricky Ponting And Sourav Ganguly Different Statement On Impact Player Rule In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रक्त काढणारा चेंडू! पाकिस्तानी गोलंदाजाच्या खुंखार चेंडूने फोडला फलंदाजाचा जबडा, पाहा व्हिडिओ
IPLपूर्वी हॉटेल रूमचा पासवर्ड विसरला सूर्या, ‘सुपला शॉट’ म्हणताच घडलं ‘असं’ काही; विराटचीही खास कमेंट





