---Advertisement---

माजी विश्वविजेत्या कर्णधारासाठी विराटच मालिकावीर! म्हणाला, ‘त्याला कधीही कमी लेखू नका, तो एकटाच…’

On: सोमवार, नोव्हेंबर 14, 2022 5:39 PM
Virat-Kohli
---Advertisement---

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा हंगाम इंग्लंडने जिंकला. यामध्ये अनेक संघातील खेळाडूंनी विशेष कामगिरी करत चाहत्यांचे लक्ष वेधले. त्यात भारताच्या एका स्टार खेळाडूचा समावेश आहे. भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहली याने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यावरून त्याचे कौतुक करावे तेवढे कमी. तो या विश्वचषकात मालिकावीर ठरला नसला तरी ऑस्ट्रेलियाचा तीन वेळेच्या विश्वविजेत्या कर्णधाराने मात्र त्यालाच मालिकावीर मानला मोठे विधानही केले. या विधानाचे त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉंटिंग (Rickey Ponting) याने विराट कोहली (Virat Kohli) याच्याबाबत म्हटले, “विराट कोहलीला कधीही तो आऊट ऑफ फॉर्म आहे किंवा खेळत नाही असे म्हणून कमी लेखू नका, कारण कोणत्याही दबावाच्या परिस्थितीत संघाला पुढे नेण्यामध्ये त्याच्यात कौशल्य आहे.”

“माझ्यासाठी या टी20 विश्वचषकाचा मालिकावीरही विराटच,” असेही पॉंटिंगने पुढे म्हटले.

आशिया चषक 2022च्या स्पर्धेआधी विराट आऊट ऑफ फॉर्म होता. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनावर आणि संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत 5 सामन्यात 92च्या सरासरीने 276 धावा केल्या. त्या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. या स्पर्धेत त्याने अफगाणिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पहिले शतकही केले. या सामन्यात त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या होत्या.

विराटच्या या विलक्षण खेळीआधी कोणीतरी म्हटले होते, तो फॉर्ममध्ये परतला तर विरोधी संघावर भारी पडतो आणि झालेही तसेच. त्याने आशिया चषकाची लय टी20 विश्वचषकातही कायम राखली आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केली. त्याने या स्पर्धेच्या 6 सामन्यात 98.67च्या सरासरीने 296 धावा केल्या. यामध्ये 4 अर्धशतकांचा देखील समावेश आहे.

ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या यंदाच्या टी20 विश्वचषकात विराटने पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी करताना संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. तसेच त्याने इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही अर्धशतक केले, मात्र संघाला पराभूत होण्यापासून वाचवू शकला नाही. Ricky Ponting said “Never write Virat Kohli off, he will carry the team from any pressure situation.”

विश्वचषक झाल्यानंतर भारताचे काही खेळाडू मायदेशी परतले, तर काही न्यूझीलंडला गेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनच्या पदार्पणाच्या वयात ‘या’ केली 407 धावांची खेळी, 50 षटकांच्या सामन्यात घडला इतिहास
आयपीएल 2023पूर्वी गुजरातच्या गोटातून मोठी बातमी, ‘या’ स्टार खेळाडूला केले रिटेन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---