भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे आयपीएल २०२१ हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळण्यास सज्ज झालेल्या शॉकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. अशातच, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधारा रिकी पाँटिंगने पृथ्वी शॉची तुलना सचिन तेंडुलकर सोबत करत यांच्यात भरपूर गोष्टी साम्य आहेत, असे म्हटले आहे.
सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडू म्हटले जाते. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावण्याचा विक्रम देखील सचिनच्या नावे आहे. तर दुसरीकडे युवा पृथ्वी शॉ याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची नुकतीच सुरुवात झाली आहे.
पृथ्वीने २०१८ साली कसोटी पदार्पण करताना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध शतक झळकावले होते. अशातच आता, दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने शॉ आणि सचिन, या दोन्ही मुंबईकर खेळाडूंमध्ये काय साम्य आहे हे सांगितले आहे.
पाँटिंग म्हणाला, “सचिन तेंडुलकर सारखी शॉची उंची कमी आहे. परंतु, तो चेंडूला बॅकफुटवरून आणि फ्रंटफुटवरून खूप जोरात मारतो. यासोबतच दोघे फिरकी गोलंदाजांना देखील उत्कृष्टरित्या खेळतात.”
पाँटिंग सध्या दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना मार्गदर्शन देत आहे. तसेच या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे सर्वांनाच पृथ्वी शॉकडून चांगली कामगिरीची अपेक्षा असणार आहे. शॉने,युएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत १३ सामन्यात २२८ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे चाहत्याने उडवली खिल्ली उडवल्यानंतर गिलने दिले चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाला
मोईन अली क्रिकेट खेळत नसता तर अतिरेकी बनला असता, तस्लीमा नसरीन यांचे वादग्रस्त विधान
आयपीएल २०२१: सर्वाधिक धावांसाठी ‘या’ चार खेळाडूंमध्ये रंगणार स्पर्धा, विराट आहे बराच पुढे





