भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा पहिल्या डावात एक खराब शॉट खेळून बाद झाला. रोहितच्या अशाप्रकारे बाद होण्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉंटिंग यांनी देखील रोहितवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रिकी पॉंटिंग यांनी स्पष्ट केले की,” रोहित सध्या ज्या प्रकारे खेळतोय यापेक्षा निश्चितच चांगला खेळू शकतो. जर तुम्हाला उत्तम कसोटी खेळाडू बनायचे असेल तर अशा प्रकारे विकेट फेकणे योग्य नाही. रोहित उत्तम खेळत होता व प्रत्येक चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध लागत होता. ही एक मोठी व शानदार खेळी झाली असती.”
रिकी पॉंटिंग पुढे म्हणाले की, “रोहितला बाद करण्यासाठी लायनने एक उत्तम सापळा रचला होता. मिड ऑनच्या खेळाडूला सीमारेषेच्या थोडे पुढे उभे केले होते. तसेच एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगवर देखील होता. त्यामुळे अशा परिस्थितीत रोहित काय करत होता, हे कुणालाच सांगता येणार नाही.
रोहित 74 चेंडूंमध्ये 44 धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियावर हळू-हळू दबाव वाढत असतानाच, रोहितने लायन विरुद्ध एक आक्रमक फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. रोहित बाद झाल्याने सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पुनरागमन झाले व त्यांनी भारतावर दबाव बनवण्यात यश मिळवले. मात्र तिसऱ्या दिवशी (17 जानेवारी) भारताकडून शार्दुल ठाकूर (67) आणि वॉशिंग्टन सुंदर (62) या दोघांनी 7 व्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली आणि भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले. त्यामुळे भारताने पहिल्या डावात सर्वबाद 336 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्याच कसोटी सामन्यात बॅटिंग- बॉलिंगमध्ये ‘सुपर’ कामगिरी करणारे भारतीय, ‘ही’ आहेत नावे
‘भारतीय संघात खराब शॉट खेळून बाद होण्याची स्पर्धा सुरू आहे का?’ पंत बाद झाल्यानंतर चाहत्यांचा प्रश्न
‘या’ भारतीयांचा कसोटी पदार्पणात नुसता धुराळा; केला ३ विकेट्स आणि अर्धशतक करण्याचा पराक्रम