---Advertisement---

श्रेयस अय्यरवर पंजाब किंग्सने तब्बल 26.75 कोटी रुपये का खर्च केले? रिकी पाँटिंग यांनी दिलं स्पष्टीकरण

On: मंगळवार, मे 27, 2025 2:29 PM
---Advertisement---

श्रेयसच्या (shreyas iyer) नेतृत्वात पंजाब किंग्स (punjab kings) संघाने आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. तसेच संघाने प्लेऑफमध्ये देखील त्यांचे स्थान निश्चित केले आहे. स्पर्धेतील 69 व्या सामन्यात काल (26 मे) रोजी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स (PBKS vs Mi) संघात जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळण्यात आला. येथे अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने 7 विकेट्सने सामना जिंकला. त्यानंतर पंजाबने टॉप2 मध्ये त्यांचे स्थान निश्चित केले आहे.

पंजाबच्या विजयानंतर प्रशिक्षक रिकी पॉंटिंग (Riki ponting) श्रेयसच्या कामगिरीबद्दल आनंदी दिसून आले. या सामन्यानंतर त्यांनी 30 वर्षांच्या श्रेयस अय्यरचे कौतुक केले. श्रेयस अय्यरने पूर्ण आयपीएल स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले आहे. त्याचे कर्णधारपद सुद्धा त्याने अतिशय उत्तम प्रकारे भूषवले आहे. तो एक शानदार खेळाडू आणि एक चांगला माणूस आहे. यामुळे आम्ही त्याच्यावर इतके पैसे खर्च केले, तो एक मजबूत लीडर आहे.

आयपीएल 2025 मेगा लिलावादरम्यान श्रेयस अय्यर (shreyas iyer) दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पंजाबने त्याला 26.75 करोड रुपयांना खरेदी केले होते. या खेळाडूने पूर्ण हंगामात त्याच्या चांगल्या खेळीने तसेच उत्तम कर्णधारपद भूषवत स्वतःला सिद्ध केले. तसेच त्याने 10 वर्षांनंतर पंजाब संघाला प्रथम प्लेऑफमध्ये पोहोचवले.

कर्णधार पद नाही तर फलंदाजी दरम्यान सुद्धा त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने 14 सामन्यांच्या 14 डावांमध्ये 51.40 च्या सरासरीने 514 धावा केल्या आहेत. आयपीएल 2025 (IPL 2025) त्याने आतापर्यंत 5 अर्धशतके झळकावली आहेत. संपूर्ण हंगामात त्याने 171.90 ने फलंदाजी केली आहे.

श्रेयस अय्यरच्या आयपीएल करिअर बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 129 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 129 34.03 च्या सरासरीने 3641 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 26 अर्धशतक आहेत, त्याची व्यक्तिगत सर्वश्रेष्ठ पारी 97 धावांची आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---