---Advertisement---

RCB vs PBKS: फायनल सामन्यात पंजाबचा संघ कुठे कमी पडला? प्रशिक्षक म्हणाले…

On: बुधवार, जून 4, 2025 6:03 PM
---Advertisement---

Ricky Ponting Statement:आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जने 11 वर्षांनी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली होती. पण ते जेतेपदापासून दूर राहिले. संघाने फायनल सामन्यात सर्वोत्तम प्रयत्न केले पण फायनलमधये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाबचा 6 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवानंतर संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी सामना जिंकण्यात काय कमतरता होती ते सांगितले. (Ricky Ponting Statement On Team)

पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी कबूल केले की इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांच्या संघाला मधल्या फळीत अनुभवाच्या कमतरतेचा फटका सहन करावा लागला.

ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या या माजी फलंदाजाने मात्र, संघातील युवा खेळाडू भविष्यात चांगली कामगिरी करतील अशी आशा व्यक्त केली. आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्जच्या प्रभावी कामगिरीचा शेवट फायनल सामन्यात आरसीबीकडून 6 धावांनी पराभवाने झाला. यासह आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची 18 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपवली.

विजयासाठी 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पंजाबचा संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. शशांक सिंगने (30 चेंडूत नाबाद 61) शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक अर्धशतक झळकावले पण त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही साथ मिळाली नाही. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पॉन्टिंग म्हणाला, “तुम्हाला आजच्या संघाला असे वाटू शकते की कदाचित थोड्याशा अनुभवाच्या अभावामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “मला माहित आहे की युवा खेळाडू भविष्यात आमच्यासाठी अनेक सामने जिंकणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती पण सामना जसजसा पुढे सरकत गेला तसतशी ती मंद होत गेली.”

दुसऱ्या डावात खेळपट्टीच्या बदललेल्या मूडबद्दल विचारले असता, तो म्हणाला, “नाही, मला तसे वाटत नाही. आम्हाला कोणतेही सबब सांगायचे नाही. शशांकने सामन्यानंतर सांगितले की ही संपूर्ण हंगामातील सर्वोत्तम विकेट (फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी) होती.”

तो म्हणाला, “सामन्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात आम्ही लय गमावली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकांमध्ये आम्ही मागे पडू लागलो. त्यानंतर, महत्त्वाच्या क्षणी आम्ही आमच्या महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या.”

तो म्हणाला, “आरसीबीला असेही वाटले असेल की त्यांनी थोड्या कमी धावा केल्या आहेत. आम्हाला 190च्या आसपासच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आनंद झाला होता. पण, लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही चांगले खेळू शकलो नाही. मी श्रेयस अय्यरसोबत मुल्लानपूरमध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वी पहिल्या पत्रकार परिषदेत हे सांगितले होते… ते एक निर्भय, आक्रमक आणि वेगळा संघ तयार करण्याबद्दल होते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---