यंदाच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत नोव्हेंबरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने असणार आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीनं ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅन्टिंगनं (Ricky Ponting) बॉर्डर गावस्कर मालिकेत कोण विजयी होणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
आयसीसी रिव्ह्यूच्या नवीन एपिसोडमध्ये बोलताना पॉन्टिंग म्हणाला की, “ही एक स्पर्धात्मक मालिका असणार आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे मला वाटते की, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये भारताविरुद्ध काहीतरी सिद्ध करावे लागेल.”
भारतानं ऑस्ट्रेलियातील शेवटच्या 2 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि मार्च 2017 मध्ये घरच्या मैदानावर मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी संघात कायम ठेवली आहे, परंतु पाॅन्टिंगला वाटते की, यावेळी ऑस्ट्रेलिया विजय होईल. तो म्हणाला की, “आम्ही 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत परतलो आहोत, जी या मालिकेतील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, शेवटी फक्त 4 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ 3-1 असा विजय मिळवेल.”
पुढे बोलताना रिकी पाॅन्टिंग (Ricky Ponting) म्हणाला, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केवळ स्मिथच फलंदाजीची सलामी देण्यासाठी योग्य व्यक्ती आहे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे, तर त्यांना ही स्थिती त्याच्यासाठी योग्य वाटते का, कारण मला वाटते की जर त्यांना असे वाटत नसेल तर. योग्य ठिकाणी मग ते बदल करतील आणि दुसऱ्या खेळाडूला तिथे परत आणतील.”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 5 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्यामध्ये पहिला कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे, तर तिसरा सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. चौथा सामना 26 ते 30 डिसेंबर आणि पाचवा सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टार फिरकीपटू भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिका खेळणार का नाही? क्रिकेट बोर्डाने स्पष्टचं सांगितले
कोहली, सिराजबद्दल ‘या’ खेळाडूनं केलं खळबळजनक वक्तव्य!
आधी जिवलग आता कट्टर प्रतिस्पर्धी! रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार