इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नियमित कर्णधार रिषभ पंत याच्या दुखापतीमुळे दिल्ली यावेळी नवा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्या नेतृत्वात स्पर्धेत सहभागी होईल. त्याचवेळी संघातील अनेक युवा खेळाडूंकडून संघ व्यवस्थापनाला मोठ्या अपेक्षा आहेत. मागील सहा वर्षापासून संघाचा भाग असलेला सलामीवीर पृथ्वी शॉ या हंगामात आत्तापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी व्यक्त केला आहे.
देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतरही पृथ्वी याला भारतीय संघात पुनरागमन करण्यात अपयश येत आहे. अशा स्थितीत आयपीएल मध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात जागा बनवण्याची त्याच्याकडे संधी असेल. त्याच्याबाबतीत बोलताना पॉंटिंग म्हणाले,
“यावेळी मला पृथ्वी सर्वात फिट वाटतोय. त्याला यशाची भूक लागलीये. मला वाटते की यावेळी आपल्या सर्वांना आजवरचा सर्वोत्तम पृथ्वी पाहायला मिळेल.”
पृथ्वीसाठी मागील हंगाम तितका शानदार राहिला नव्हता. मागील हंगामात तो केवळ 10 सामने खेळताना 283 धावा बनवू शकलेला. यावेळी कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्यासह त्याच्या खांद्यावर संघाला चांगली सलामी देण्याची जबाबदारी असेल.
आयपीएल 2023 हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार आहे. गतविकेचा गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाईल. हंगामातील तिसऱ्या सामन्यात 1 एप्रिल रोजी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना होईल.
आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स संघ-
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रॉवमन पॉवेल, सर्फराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एन्रिक नोर्कीए, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजूर. रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, फिल सॉल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे, रायली रुसो.
(Ricky Ponting Hoping This Best IPL Season For Prithvi Shaw)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या टी20 शतकाने नववीच्या विद्यार्थ्यांचे वाढले मार्क! जाणून घ्या नक्की घडलं काय?
सततच्या दुखापतींनंतर बीसीसीआय ‘ऍक्शन मोड’मध्ये! आयपीएलमध्ये प्रमुख खेळाडूंवर ‘तिसरा डोळा’ ठेवणार लक्ष