7 जूनपासून आॅस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा आॅस्ट्रेलियाच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या दौऱ्यात पाँटिंग आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना सहाय्य करेल. याआधीही पाँटिंगने दोनवेळा आॅस्ट्रेलियाच्या टी20 संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
याआधीच पाँटिंगने प्रशिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्याने नुकतेच आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स संघाचे प्रशिक्षकपद संभाळले आहे.
पाँटिंगबद्दल प्रशिक्षक लँगर म्हणाले, “रिकी हा क्रिकेटमधील दिग्गज आहे आणि तो सध्या इंग्लंडमध्ये समालोचन करत आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटले की त्याला महत्त्वाच्या मालिकेसाठी संघात सामील करून घेण्याची ही एक चांगली संधी आहे.”
याबरोबरच ते म्हणाले, पाँटिंगकडे कर्णधार म्हणून चांगला अनुभव आहे. तसेच त्याच्या रणनीती कौशल्याचाही संघाला उपयोग होईल.
लँगर पुढे असेही म्हणाले की, “आम्ही एक वर्षांनंतर होणारा विश्वचषक या परिस्थितीत जिंकण्यासाठीचा संघ तयार करत आहोत.”
पाँटिंग 10 जूनपासून आॅस्ट्रेलियाच्या कोचिंग स्टाफबरोबर त्याचे काम सुरू करेल. आॅस्ट्रेलिया या दौऱ्यात इंग्लंडविरुद्ध दोन सराव सामने, 5 वनडे आणि 1 टी20 सामने खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–तामिल थलायवाजकडून कबड्डी अकादमी स्थापनेची घोषणा
–फिफा विश्वचषक २०१८- ओळख अ गटाची
–फिफा विश्वचषकापूर्वी अर्जेंटीनाचा सराव सामना खेळण्यास नकार
–आजच्या दिवशी लाराने केली होती प्रथमश्रेणी क्रिकेटमधील संस्मरणीय खेळी
–टेनिसचे “बिग फोर” संपले – बोरीस बेकर