ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग याने आगामी वनडे विश्वचषकाविषयी भविष्यवाणी केली आहे. आगामी वनडे विश्वचषक यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये खेळला जाणार आहे. अशात भारतीय संघ यावर्षी विश्वचषक जिंकण्याासठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. असे असले तरी, रिकी पाँटिंगच्या मते ऑस्ट्रेलिया संघ देखील यावर्षीची विश्वचषक जिंकू शकतो. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया विश्वचषक जिंकवून देईल, असे मत पाँटिंगने व्यक्त केले.
रिकी पाँटिंगने मंगळवारी (4 एप्रिल) दिलेल्या एका मुलाखतीत वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) विषयी मोठी भविष्यवाणी केली. पाँटिंग म्हटले की, “मिचेल स्टार्क (Mitchell Starc) परिपूर्ण आहे. तो 6 फुट 8 इंचाचा आहे आणि 140 किमी ताशी पेक्षा अधिक गतीने गोलंदाजी करतो. तो एक डावखूर गोलंदाज आहे आणि नवीन चेंडू आतमधल्या बाजूला चांगल्या पद्धतीने वळवू शकतो. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सोबत (वनडे मालिकेदरम्यान) त्याने असेच केले.”
“स्टार्क जेव्हा लयीत असतो, तोव्हा कोणत्या चांगल्या गोलंदाजाइतकाच चांगला खेळतो. मागच्या मोठ्या काळापासून तो असे प्रदर्शन करत आला आहे. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे काही लोक निचेल स्टार्क आणि त्याच्या प्रदर्शनावर निशणा साधत आहेत. पण परिस्थिती पाहिली, तर तो एक खतरणाक व्हाईट बॉल क्रिकेटपटू आहे आणि त्याची आकडेवारी चांगली राहिली आहे,” असेही पाँटिंग म्हणाला.
रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्या मते ऑस्ट्रेलियासाठी आगामी वनडे विश्वचषकात मिचेल स्टार्क () आणि ऍडम झंपा () ट्रॉफी उंचावण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. ऑस्ट्रेलियाचा 33 वर्षीय वेगवान गोलंदाज स्टार्क नुकताच भारत दौऱ्यावर आला होता. भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळताना स्टार्कने 8 विकेट्स घेतल्या. मालिकेतील दुसरा वनडे सामना विशाखापट्टणममध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये स्टार्कने तब्बल 5 विकेट्स घेत भारताला गुडघे टाकायला लावले होते. मार्चमध्ये खेळलेली ही मालिका ऑस्ट्रेलिायने 1-2 अशा अंतराने नावावर केली. स्टार्कने यापूर्वी 2019 आणि 2015 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारणामाही केला होता.
नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेत स्टार्कने आपली भारतीय खेळपट्टीविषयी असलेली जाण दाखवून दिली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झंपा (Adam Zampa) याला चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. वनडे मालिकेतम मात्र झंपाने आपल्याला मिळालेल्या संघाचे सोने केले. या 31 वर्षीय फिरकीपटूने भारतीय खेळपट्टीवर आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. त्याने मालिकेत तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात 21 धावा देत चार विकेट्स घेतल्या आणि मालिका नावावर केली. (Ricky Ponting made a big prediction about ODI World Cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING । लवकरच श्रेयस अय्यरची मोठी शस्त्रक्रिया, आयपीएलसह महत्वाच्या सामन्यालाही मुकणार
आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट! महामारीच्या कचाट्यात अडकला भारतीय दिग्गज