इंडियन प्रीमियर लीग 2023ची स्पर्धा मोठ्या जोमात खेळली जात आहे. तसेच, या वेळी सामन्यांमध्ये होणारी आगेकूच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवत आहे. बुधवारी (दि. 10 मे) रोजी एमए चिदंबरम स्टेडिअमवर रंगलेला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघांचा सामना पाहण्याजोगा ठरला. यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने सामन्यादरम्यान खेळल्या गेलेल्या निर्धाव चेंडूंविषयी भाष्य केले.
सीएसकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान दिल्ली संघाला काही षटकांमध्ये निर्धाव चेंडू खेळल्याचे जाणवले. यादरम्यान 168 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली संघाला 27 धावांनी हार पत्करावी लागली. दरम्यान, सामन्यानंतर रिकी पाँटिंग (Rinky Ponting) माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “खेळादरम्यान आम्ही एकाच षटकामध्ये तीन विकेट्स गमावल्या. फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी खेळपट्टीवर आले, त्यावेळी फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याची आमची कोणतीही तयारी नव्हती.”
ते 34 निर्धाव चेंडू
यावेळी पुढे बोलताना पाँटिंग म्हणाला, “सीएसकेविरुद्ध खेळ रंगत आल्यानंतर अचानक मधल्या षटकांमधील जवळपास 34 चेंडू निर्धाव खेळले गेले. जर या षटकातील 34 चेंडू निर्धाव गेले नसते, तर या सामन्यावर आमचे नाव कोरले असते. दरम्यान, 34 चेंडू निर्धाव पडल्यानंतर कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करून विजय आपल्या नावावर करणं शक्य नाही.”
विकेटची खंत कायम राहील
चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यानंतर माध्यामांशी बोलताना पाँटिंगने 2023 मधील संघाच्या खेळाचा खुलासा केला. यावेळी तो बोलताना म्हणाला की, “चालू हंगामात संघातील खेळाडूंची पहिल्याच षटकात अनेकदा विकेट गमावल्याची खंत आहे. शिवाय, या हंगामातील ही पाचवी, सहावी किंबहूना ही सातवी वेळ होती, जेव्हा आम्हाला पहिल्याच षटकामध्ये विकेटला सामोरे जावे लागले आहे.”
खराब फॉर्मशी झगडत आहे पृथ्वी शॉ
दिल्ली कॅपिटल्स संघातील भारतीय खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या संघाच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना दिसत नसल्याने, शॉला इलेव्हनमधून वगळण्यात आल्याचे पुढे पॉंटिंगने सांगितले. तसेच, पृथ्वीने खेळपट्टीवर काही खास करामत करून दाखवली नसल्याने संघाला त्याचा तोटा होत असल्याचे पॉंटिंग म्हणाला.
शॉविषयी बोलताना पाँटिंग म्हणाला की, “तो खेळत नाही, हे तथ्य नाहीये. खरं तर, हे या गोष्टीचे संकेत आहेत की, त्याने आम्हाला जशी अपेक्षा होती, तशी कामगिरी केली नाही. आतापर्यंत कुणीच संघासाठी दोन्ही हातांनी संधीचा फायदा उचलला नाहीये.”
दिल्लीचा पुढील सामना
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या पुढील सामन्याविषयी बोलायचं झालं, तर 13 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स संघात आयपीएल 2023चा 59वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. (Ricky Ponting on prithvi shaw form after defeating by csk in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसके आणि जडेजातील मतभेत पुन्हा चव्हाट्यावर, सोशल मीडियावर लाईक केली ‘ही’ पोस्ट
‘आम्ही पॉवरप्लेमध्येच हारलो, आमचे फलंदाज दुर्दैवी…’, CSKकडून दारुण पराभव होताच वॉर्नरचे मोठे भाष्य