जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी केलेल्या टिच्चून फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही गुरुवारी (8 जून) भारतीय गोलंदाजांनी काही प्रमाणात पुनरागमन केल्याने 469 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. भारतीय संघासाठी मोहम्मद सिराज याने सर्वाधिक चार बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने त्याचे कौतुक केले.
सामन्याच्या पहिल्या दिवशी ट्रेविस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी 251 धावांची नाबाद भागीदारी केल्याने भारतीय संघ पिछाडीवर पडला होता. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा डाव 469 धावांवर संपुष्टात आणला. त्याने 108 धावा देत चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये सलामीवीर उस्मान ख्वाजा व सर्वाधिक धावा बनवणारा हेड यांचाही समावेश होता.
या सामन्यातील गोलंदाजीनंतर समालोचन करत असलेला पॉंटिंग म्हणाला,
“सिराज मला अस्सल प्रतिस्पर्ध्यासारखा वाटतो. कधीकधी तो भावनेच्या भरात वाहून जातो. तर, कधी त्याची कामगिरी एकदम शीर्षस्थानी पोहोचते. जेव्हा सर्व गोष्टी तुमच्या बाजूने घडत नसतात तेव्हा अशा खेळाडूंची तुम्हाला गरज असते.”
सिराज याने या सामन्यात सुरुवातीपासूनच भेदक गोलंदाजी केली होती. त्याने दुसऱ्या षटकात भारतीय संघाला यश मिळवून दिलेले. त्यानंतर शतकाच्या जवळ आलेल्या हेड याला आपल्या तिसऱ्या स्पेलमध्ये त्याने बाऊन्सर्स मारून हैराण केले. तसेच दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला पहिला बळी देखील त्यानेच मिळवून दिलेला. तसेच अनुभवी स्मिथ याच्याशी देखील त्याने पंगा घेतल्याचे दिसून आले.
(Ricky Ponting Praised Mohammad Siraj After WTC Final Spell)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट






