ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्या दरम्यान एक मोठी घटना घडली. पर्थ येथे सुरू असलेल्या सामन्यात समालोचकाची भूमिका बजावत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याची तब्येत बिघडली असून, त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याची तब्येत ठीक असल्याचे सांगितले.
ऑस्ट्रेलिया संघ या कसोटीत तिसऱ्या दिवशी आघाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्य अखेरीस खेळ सुरू असताना पॉंटिंग याच्या छातीत दुखू त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये रवाना केले गेले. मात्र, डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर तो ठीक असून केवळ थोडी विश्रांती करावी लागेल असे सांगितले. ज्या प्रसारण वाहिनीसाठी पॉंटिंग समालोचन करत आहे त्या वाहिनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ‘तब्येत खराब असल्याने रिकी पॉंटिंग तिसऱ्या दिवशीच्या उर्वरित सत्रांमध्ये समालोचन करताना दिसणार नाही.’ तिसऱ्या दिवशी तो समालोचन करणार नसला तरी, आणखी दोन दिवस तो उपलब्ध असेल की नाही याबाबत मात्र कोणतीही माहिती दिली गेली नाही.
या सामन्याचा विचार केला गेल्यास ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्युशेन व स्टीव्ह स्मिथ यांच्या द्विशतकांच्या जोरावर 4 बाद 598 धावांवर आपला डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडीज संघाला केवळ 283 धावांपर्यंतच मजल मारता आली. पहिल्या डावात मोठी आघाडी मिळालेल्या ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या दिवसाखेर 1 बाद 29 धावा केल्या आहेत. सध्या त्यांची आघाडी एकूण 344 धावांची आहे.
(Ricky Ponting rushed to hospital after health scare during day three of first Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमका तो गोल होता की नाही? जपानच्या ‘त्या’ वादग्रस्त गोलमुळे जर्मनी स्पर्धेबाहेर
ब्रेकिंग! ड्वेन ब्रावोची आयपीएलमधून निवृत्ती, पुढील हंगामासाठी घेतली ‘ही’ मोठी जबाबदारी खांद्यावर