भारतीय क्रिकेट संघाचा तसेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 मध्ये शानदार कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याच्या मार्गदर्शनाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याचवेळी पॉंटिंग याने एका मुलाखतीत बोलताना रोहित शर्मा याचे मनमोकळेपणाने कौतुक केले.
रोहित शर्मा याने 2013 मध्ये रिकी पॉंटिंग याच्याचकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते. निम्म्या हंगामात पॉंटिंग हा रोहित याच्या नेतृत्वात खेळलेला. विशेष म्हणजे रोहितने त्यावेळची मुंबईला विजेतेपद पटकावून दिले. पॉंटिंग हा नेहमीच रोहित याची स्तुती करताना दिसतो. नुकतेच एका प्रसारण वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“मी वैयक्तिकरित्या रोहितचा खूप आदर करतो. त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांची तो खूप काळजी करतो. खेळाडूंमधून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचे त्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे. या गोष्टीच त्याला एक उत्तम कर्णधार बनवतात.”
रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केलेय. तसेच तो सध्या भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा अंतिम सामना ओव्हल येथे खेळला जाईल.
दुसरीकडे, रिकी पॉंटिंग याच्या मार्गदर्शनाखालील दिल्ली कॅपिटल्स यावेळी गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. दिल्लीला पहिल्या पाच सामन्यात एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर आता दिल्लीचा अखेरचा सामना चेन्नईविरुद्ध होईल. हा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न दिल्ली कॅपिटल्स करेल.
(Ricky Ponting Said I Respect Very Much Rohit Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! विराटने शतक ठोकताच पत्नी अनुष्काने लावला व्हिडिओ कॉल, अभिनेत्रीकडून पतीवर प्रेमाचा वर्षाव
‘कुणीतरी विराटच्या शतकाने…’, प्रसिद्ध पत्रकाराने गंभीरवर पुन्हा साधला निशाणा, लगेच वाचा